Home »Maharashtra »Mumbai» Navi Mumba Municipal Corporation Budget Present By Commissioner Bhaskar Wankhede

मुंबईकरांवर कराचा बोजा नसेल; महापालिकेचा 2575.97 कोटीचा अर्थसंकल्प

दिव्य मराठी नेटवर्क | Feb 20, 2013, 18:02 PM IST

  • मुंबईकरांवर कराचा बोजा नसेल; महापालिकेचा 2575.97 कोटीचा अर्थसंकल्प

मुंबई- नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भास्कर वानखेडे यांनी स्थायी समितीच्या सभेत करवाढ नसलेला एकूण 2575.97 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात 54 लाख रूपये शिल्लक दाखवण्यात आले आहे. गेल्या वर्षी 2200 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. यंदा तो 2500 कोटी रुपयांच्या घरात गेला आहे.

महापालिका राबवित असलेल्या मोठ्या प्रकल्पसाठी एमएमआरडीए आणि जेएनएनआरए या संस्थाकडून मिळणार्‍या कर्जाचाही समावेश करण्यात आला आहे. नवी मुंबई शहर आणि एमआयडीसीमध्ये महापालिका वसूल करीत असलेला उपकर यंदा पाचशे कोटींवरून आठशे कोटींवर नेण्याचा पालिकेचा इरादा आहे.

येणार्‍या आर्थिक वर्षात शहरातील आरोग्य व्यवस्थेमध्ये आधुनिक सुविधा आणण्यासोबत शिक्षणावर विशेष भर देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कर्करोगासारख्या रोगाने ग्रस्त असलेल्या रूग्णांवर अल्पदरात सर्जरी करण्यासाठी टाटा कॅन्सर रूग्णालयाशी करार करण्यात येणार आहे.

ठाणे-बेलापूर एमआयडीसीमध्ये सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे. तसेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणे तसेच त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले रुंद करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या मोकळ्या जागेवर आयटी पार्क उभारण्याचेही विचारधीन असल्याचे आयुक्त वानखेडे यांनी यावेळी सांगितले.

Next Article

Recommended