आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navi Mumbai Airport: Farmers Divided Over Compensation

नवी मुंबई विमानतळ भूसंपादनात अडथळे, सिडकोने लावला बैठकांचा धडाका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याच्या योजनेतील अडचणींचा पाढा कमी होताना दिसत नाही. विमानतळासाठी भूमी संपादनाचा अडथळा अजूनही सुरूअसून जूनमध्ये नव्याने लागू होणार्‍या भूमी संपादन कायद्यापूर्वीच भूमी संपादन करण्यासाठी सिडको अधिकारी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून त्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे.

विमानतळासाठी भूमी संपादन करणे हेच मोठे अवघड काम आहे. खरे तर या योजनेसाठी विशेष बाब म्हणून मूळ जमिनीच्या 22.5 टक्के विकसित जमीन देण्याचे मान्य करण्यात आले आहे. परंतु काही राजकीय पक्षांनी येथील नागरिकांना अवाच्या सव्वा गोष्टी सांगून त्यांना भुलवल्याने नागरिकांची मागणी वाढत असल्याचेही या अधिकार्‍याने सांगितले.

जूनमध्ये भूमी संपादनाचा नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूमी संपादन लवकरात लवकर करून घेण्याकडे सिडको अधिकारी लक्ष देत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठका होत आहेत. नागरिकांना याची माहिती होण्यापूर्वीच जास्तीत जास्त भूमी संपादन करण्याची योजना या बैठकीत आखली असून या महिन्याच्या शेवटापर्यंत जास्तीत जास्त भूमी संपादन केले जाणार अहे. भूमी संपादनाच्या नवीन कायद्यानुसार मोबदला द्यावा लागला तर सिडकोला नवी मुंबई विमानतळाची योजनाच रद्द करावी लागेल असेही या अधिकार्‍याने सांगितले.