आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Navi Mumbai Builder\'s Murder, The Whole Incident Caught On CCTV Camera

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिल्डर सुनीलकुमार हत्येप्रकरणी माजी पोलिस अधिकारी ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील वाशी येथील बिल्डर सुनीलकुमारच्या हत्येप्रकरणी निवृत्त पोलिस अधिकारी इमॅन्यु्ल अमोलिक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. वाशीतील सेक्टर 29 मध्ये दोन अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी सकाळी बिल्डर सुनीलकुमार यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

आज सकाळी ताब्यात घेण्यात आलेले अमोलिक हे चकमक फेम अधिकारी आहेत. त्यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे त्यांना पोलिस दलातून काढून टाकण्यात आले होते. शनिवारी पकडण्यात आलेल्यासह इतर हल्लेखोरांशी ते संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

एस. के. बिल्डरचे मालक सुनीलकुमार शनिवारी सकाळी त्याच्या वाशीतील कार्यालयात कारने आले. ते कारमधून उतरताच सुरक्षा रक्षकाच्या पोषाखातील हल्लेखोरांनी कुमार यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर चॉपरने त्यांच्यावर वार केले. कुमार यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हल्ल्यानंतर उपस्थित जमावाच्या मदतीने घटनास्थळाच्या जवळच असेल्या गस्तीवरील पोलिसांनी एकाला हल्लेखोराला अटक केली. जमाव आणि पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले होते. त्याचे नाव व्यंकटेश शेट्टीयार उर्फ मनू शेट्टी असे आहे.

मात्र, इतर एक जण फरार झाला. कुमार यांच्या एस. के. डेव्हलपर्स या कार्यालयात गेल्या दोन वर्षांत चार वेळा चो-या झाल्या आहेत. या सर्व चो-या कागदपत्रे चोरण्याच्या उद्देशानेच करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सुनीलकुमार यांच्या हत्येमागे प्रॉपर्टीचा वाद असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, पकडण्यात आलेल्या शेट्टयार याने तो शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्याकडे काम करतो असे सांगतले आहे. आता, माजी पोलिस अधिकारी या प्रकरणात गोवलेगेल्यामुळे हत्येचे गुढ वाढले आहे.