आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navi Mumbai Municipal Corporation Elections Result Declare Today

नवी मुंबई त्रिशंकू, गणेश नाईकांचा करिश्मा कायम, NCP मोठा पक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्‍ट्रवादीचा करिश्मा कायम असल्याचे पक्षाचे नेते गणेश नाईक यांनी दाखवून दिले आहे. राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्याला बहुमत मिळवता आले नाही. राष्ट्रवादीला बहुमतासाठी तीन जागा कमी आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीला कॉंग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे. शिवसेना-भाजप युतीने 44 जागा काबिज केल्या. मात्र, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे महानगरपालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.

नवी मुंबई हा राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचा गड मानला जातो. त्यामुळे नवी मुंबईत नाईकांना एकहाती सत्ता मिळणार असे भाकीत जाणकारांनी मतमोजणीपूर्वीच मांडेले होते. मात्र, महायुतीच्या मंदा म्हात्रे, विजय नाहटा आणि एकनाथ शिंदे यांनी नाईकांना जोरदार टक्कर दिली. कॉंग्रेसचा मात्र, 10 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

काल (बुधवारी) सरासरी 51 टक्के मतदान झाले. एकूण 111 प्रभागात 564 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. नवी मुंबईच्या महापालिकेवर मागील 20 वर्षांपासून गणेश नाईकांची एकाहाती सत्ता आहे. त्यामुळे नाईक यांना आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळते की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

काही जनमत चाचणीत नवी मुंबईकरांनी पुन्हा सत्तेचा सोपान नाईक यांच्या हाती सोपविल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, महापालिकेत यावेळी त्रिशंकू स्थिती असेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत नोंदवले होते.

दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत गेल्या वेळच्या तुलनेत यंदा तब्बल आठ टक्क्यांनी जास्त मतदान झाले. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा नेमका कुणाला होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मतदानादरम्यान बोगस मतदान आणि तुरळक हाणामारीचे प्रकार घडले होते. राष्ट्रवादीने बोगस मतदारांच्या मदतीने मतदान केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. विशेष म्हणजे बोगस मतदारांनी कॅमेर्‍यासमोर कबुलीही दिली आहे. दुसरीकडे, नेरुळच्या कुकशेत गावात प्रभाग क्रमांक 85 मध्ये 70 जणांनी बोगस मतदान केल्याचा आरोप शिवसेनेने केला. यातल्या काही जणांना शिवसैनिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
नवी मुंबई महायुती कॉंग्रेस राष्ट्रवादी इतर
एकूण 111 44 10 52 5

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, वॉर्डनिहाय विजयी उमेदवारांची नावे...