आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: चिमुकलीला मारहाण करणाऱ्या आयासह संचालिकेवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुपारच्या वेळी चिमुकली झोपत नाही म्हणून आयाने तिला बेदम मारहाण केली. हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. - Divya Marathi
दुपारच्या वेळी चिमुकली झोपत नाही म्हणून आयाने तिला बेदम मारहाण केली. हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.
नवी मुंबई - पती-पत्नी नोकरीनिमीत्त घराबाहेर जात असताना लहान मुलांची व्यवस्था पाळणाघरात करणे आता सार्वत्रिक झाले आहे. मात्र तुमचे बाळ पाळणाघरात सुरक्षित आहे का, याची खात्री करुन घ्या. नवी मुंबईतील एका पाळणाघरात दाईने १० महिन्यांच्या मुलीस बेदम मारहाण केल्याचे प्रकरण समोर आलेे. पाळणाघराच्या व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाई मुलीला आपटून मारहाण करत होती. पोलिसांनी पाळणाघराची मालकीण आणि मुलीला मारहाण करणाऱ्या दाईस अटक केली आहे. २१ नोव्हेंबर रोजीच्या व्हिडिओमधून ही बाब समोर आली. पूर्वा पाळणाघरात दाई अफसाना नासीर शेख चिमुरडीला जमिनीवर आपटत मारहाण करत होती. डोक्याच्या आतमध्ये गंभीर दुखापत झाल्यामुळे मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे. पूर्वा पाळणाघराची मालकीण प्रियंका निकम दाई अफसाना नासीर शेखला अटक केली आहे. प्रियंका निकमला गुरुवारी जामीन मिळाला. अफसानाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पाळणाघर की छळछावणी
चिमुकलीला मारहाणीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर याला पाळणाघर म्हणायचे की मुलांची छळछावणी असा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणाची दखल राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली आहे. पाळणाघराच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत.
काय आहे प्रकरण
- खारघर येथील सेक्टर १० मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे. येथे पाळणाघर देखिल आहे.
- २१ नोव्हेंबर रोजी रजत सिन्हा यांनी त्यांच्या १० महिन्यांच्या चिमुकलीला प्रथमच येथे ठेवले. पाळणाघरातील हा तिचा पहिलाच दिवस होता.
- रजत सिन्हांनी सांगित्यानुसार, 'संध्याकाळी मुलीला घरी आणल्यानंतर ती गप्प-गप्प होती. तिच्या डोक्याला जखम झाल्याचे दिसत होते.'
- 'आम्ही तिला वाशीच्या फोर्सिस हॉस्पिटलमध्ये नेले. तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की, तुमच्या मुलीला कुणीतरी मारहाण केली आहे. डॉक्टरांंनी तात्काळ तिचं सिटीस्कॅन केलं. तेव्हा तिच्या मेंदूला थोडी दुखापत झाल्याचं समोर आलं.'
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, १० महिन्यांची चिमुकली दुपारच्या वेळी झोपत नव्हती म्हणून आयाने तिला बेदम मारहाण केली.
- पाळणाघरातील पहिल्याच दिवशी मुलीला एवढी जबर दुखापत होण्याची विचारणा जेव्हा पालकांनी पाळणाघर संचालक प्रियंका निकमकडे केली तेव्हा मुलगी पडल्याचे तिने सांगितले,
- रजत यांनी पाळणाघराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा धक्कादायक चित्र त्यांना दिसले. आया अफसाना नासिर शेख चिमुकलीला उचलून फेकत होती. लाथेने मारत होती.
- रजत यांनी तत्काळ पोलिसात धाव घेतली. मात्र पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन गुन्हा नोंद करण्यास नकार दिला.
- दरम्यान पाळणाघर संचालक प्रियंका निकमच्या नवऱ्यानेही रजत यांना, 'पोलिसात गेले तर...' अशी धमकी दिली.
पोलिसांची चालढकल, माध्यमांच्या पुढाकारानंतर कारवाई
- रजत यांच्या चिमुकलीसोबत पाळणाघरात जे काही झाले होते त्याची माहिती त्यांनी मीडियाला दिली आणि त्यानंतर पोलिस कारवाईसाठी सरसावले.
- या सर्व प्रकाराने पूर्वा प्ले स्कूलमधील मुलांचे पालक धास्तावले आहेत. रजत यांच्या मुलीला मारहाण होत होती तेव्हा इतर मुले गाढ झोपलेली होती. त्यांच्यासोबतही आयाने असेच काही केले नसेल कशावरुन असा प्रश्न पालक विचारत आहेत.
- पूर्वा प्ले स्कूलमधील धक्कादायक प्रकरणाची दखल राज्य सरकारने घेतली असून राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी या पाळणाघराची माहिती मागवली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आया अफसानाचा अमानुषपणा...
बातम्या आणखी आहेत...