आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - पतियाळाच्या नवनीतकौर धिल्लनने (20) रविवारी पाँड्स फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2013चा किताब पटकावला. यंदाच्या विश्वसुंदरी स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करील. गतविजेती वन्या मिश्राने तिला शिरपेच चढवला. मिस इंडिया इंटरनॅशनल झोया अफरोझ (18), मिस इंडिया अर्थ शोभिता धुलिपाला (20) या ठरल्या. लखनऊची झोया मॉडेलिंग करते. शोभिता विशाखापट्टणमची असून, धिल्लन मीडियाची विद्यार्थिनी आहे.
अनुकृती गुन्साई, झोया अफरोझ, नवनीत धिल्लन, सृष्टी राणा आणि शोभिता धुलिपालाने टॉप पाचपर्यंत मजल मारली. ‘उद्याच तुमचे आयुष्य संपणार असेल, तर तुम्हाला सर्वाधिक पश्चात्ताप कशाचा असेल?’ असा शेवटचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. सोहळ्यात ऐश्वर्या बच्चन, प्रियांका चोप्रा, गायक सोनू निगम यांनी सादरीकरण केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.