आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - अभिनेत्री तसेच आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर यांनी जात प्रमाणपत्रासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याच्या तक्रारीची चौकशी करून एफआयआर दाखल करण्याचे निर्देश महानगर दंडाधिका-यांनी दिले आहेत. नवनीत यांना लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावती मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
नवनीत कौर यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करणारी याचिका अॅड. जयंत वंजारी यांनी दाखल केली होती. कौर यांना प्रमाणपत्र मिळावे यासाठी त्यांच्या वडिलांनी कुर्ला तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यासोबत शाळा सोडण्याचा दाखलाही जोडण्यात आला होता, असे वंजारी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. माहिती अधिकारांतर्गत शिक्षण विभागाकडून मागवलेल्या माहितीनुसार नवनीत यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा वंजारी यांनी केला होता. त्यावर संबंधित पोलिस ठाण्याने तपास करून नियमानुसार एफआयआर दाखल करावा, असा आदेश महानगर दंडाधिकारी एस. एच. भागडे यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.