आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navneet Rana News In Marathi, Caste Validity Certificate, Divya Marathi

नवनीत राणांच्या मदतीला जात पडताळणी समिती?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान देणा-या प्रकरणावर निर्णय देण्याऐवजी हे प्रकरण लांबवत ठेवून राणा या लोकसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरून तो वैध ठरण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याचा निकालच येऊ द्यायचा नाही, असे प्रयत्न केले जात आहेत.मुंबईच्या जातपडताळणी समितीसमोर या प्रकरणी बुधवारी सुनावणी निश्चित झाली असताना या सुनावणीपूर्वीच पुन्हा तपासणी करण्याचे आदेश या समितीने दिले. त्यामुळे तक्रारदारांना मोठा धक्का बसला आहे.

उमेदवारी अर्ज पुढील आठवड्यात भरले जाणार आहेत आणि जातपडताळणी समितीचा अहवाल मार्चच्या अखेरीस येईल. त्यामुळे आता राणा यांचा अर्ज निवडणूक अधिका-याद्वारे रद्द होण्याची शक्यता मावळली आहे. अमरावती लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस 22 मार्च असून छाननी 24 मार्चपर्यंत या अर्जांची छाननी होणार आहे. त्यामुळे बुधवारी 19 मार्च रोजी समितीने जर राणा यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केले असते तर त्यांच्या सर्व अपेक्षेवर पाणी फेरले गेले असते.