आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - अमरावती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांना जिल्हा प्रशासनाने दलित असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमानुसार त्या निवडणूक लढवण्यास पात्र आहेत. तरीही राजकीय विरोधासाठी त्यांचे प्रमाणपत्र बोगस असल्यासाठी खटाटोप करण्यात येत आहे. मात्र, नवनीत या दलित समाजातीलच असून दलितांची मुलगी सुंदर असू शकत नाही, असे कोणाला वाटत असेल, तर ते साफ चुकीचे आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रसने घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नबाव मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन नवनीत यांना मदतीचा हात दिला. नवनीत यांच्या सिनेमातील काही दृश्यांवरून, तसेच फोटोंवरून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्या विरोधात राष्ट्रवादी निवडणूक आयोग तसेच पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहे, असे मलिक यांनी सांगितले.
अडसूळ पितापुत्रांचा डाव- खासदार आनंदराव अडसूळ व त्यांचे पुत्र व आमदार अभिजित अडसूळ यांनी नवनीत यांच्या जातीचा प्रश्न उपस्थित करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, त्यामागे केवळ बदनामी हाच हेतू आहे, असाही मुद्दा राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.
मुंडे काँग्रेसमध्ये जाण्यास उत्सुक होते!- काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये नाराज असलेले गोपीनाथ मुंडे हे 10 जनपथपुढे काँग्रेसमध्ये येण्यासाठी लोटांगण घालत होते. मात्र, त्या वेळी त्यांच्या जवळच्या मित्रांनीच त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यास विरोध केला होता. तेच मुंडे आता शरद पवार यांना एनडीएसोबत येण्यासाठी मी रोखले, असा विनोद करत आहेत, असा टोला मलिक यांनी मारला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.