आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई- मोबाईल चोरट्यांच्‍या टोळीचा पर्दाफाश, 80 मोबाईलसह शस्‍त्रे जप्‍त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवरात्र उत्सवामुळे होणा-या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या चोरट्यांकडूनर तब्‍बल ८० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ११ आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त आर. डी. शिंदे यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे.

मुंबईमध्‍ये गणेशोत्‍सव, नवरात्री व इतर सण उत्‍सवांत होणा-या गर्दीचा फायदा घेऊन दरवर्षी ही टोळी सक्रीय होत असे. ३० सप्टेंबर रोजी कॉटग्रिन येथे पेट्रोल पंप लुटण्यासाठी काही चोर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार सापळा रचून पाेलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला.
अनेक शहरात सक्रीय
पोलिसांच्‍या माहितीनुसार ही टोळी कानपूर येथील असून ती मोठी आहे. वेगवेगळ्या शहरांमध्‍ये गर्दीचा फायदा घेऊन ही टोळी सक्रीय होत असते. प्रत्‍येक शहरात लुट, चोरीची कामे चोरटे करतात. त्‍यामुळे या टोळीतील चोरटे आणखी कुठे पसरले आहेत ही माहिती समोर येऊ शकते.
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून वाचा, रिवॉल्व्हरसह जवळ काय बाळगत चोरटे..