आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेव्ही बेस म्हणून शिवाजी महाराजांनी बांधला हा किल्ला, शिसे ओतून केलीय पायाभरणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंधुदुर्ग फोर्टचा टॉप व्यू... - Divya Marathi
सिंधुदुर्ग फोर्टचा टॉप व्यू...

मुंबई- भारतात सोमवारी नौदल दिवस (नेव्ही डे) साजरा करण्यात आला. यानिमित्त आम्ही आपल्याला चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेव्ही बेस म्हणून उभारलेल्या प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्याबाबत माहिती सांगणार आहोत. शिवाजी महाराजांच्या काळात आरमाराला खूप महत्त्व होते. सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले बांधण्याचे निश्चित केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनाऱ्यााची पाहणी महाराजांनी सुरू केली. त्यात त्यांना मालवण भागातील काळा व कठिण खडक असलेली ही जागा दिसली. मग महाराजांनी जलदुर्ग म्हणून याची निवड केली. पुढे महाराजांनी किल्ल्याची तटांची पायाभरणी केली.

 

पुण्यापासून सुमारे 350 किलोमीटर दूरवर हा किल्ला चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. या किल्ल्याचे खास वैशिष्टये हे आहे की, या किल्ल्याची पायाभरणी करताना वितळवलेले शिसे टाकले होते. संपूर्ण बुरूज आणि धारदार खडकामुळे या किल्ल्याला एक असामान्य महत्त्व आहे. अरबी समुद्रात आहे किल्ला...
 
- हा किल्ला तळ कोकणात म्हणजेच सिंधुदुर्गमध्ये आहे. हा किल्ला संपूर्ण समुद्रात पसरलेला आहे. समुद्रात पसरलेल्या एका खडकावर हा किल्ला उभा आहे. 
- भर समुद्रात लाटांनी वेढलेला हा किल्ला सुमारे 48 एकरात पसरलेला आहे. शिवाजी महाराजांच्या काळात आरमाराला मोठे महत्त्व होते. मराठा साम्राज्यासाठी हा किल्ला नेव्ही बेस होता.
- सांगितले जाते की, शिवाजी महाराजांच्या काळात समुद्रात युरोपियन खासकरून पोर्तूगीज लोकांचे वर्चस्व राहायचे. त्यांना शह देण्यासाठी महाराजांनी या किल्ल्याची निवड केली. येथे आरमार उभारल्यानंतर सर्व युरोपियन खलाशी एक झाले व मराठा साम्राज्याला आव्हान देऊ लागले. मात्र, या किल्ल्याची तटबंदी अशी होती की, त्यांना मराठा साम्राज्याकडून वारंवार मार खावा लागला.
 
गरम शिसे ओतून केली पायाभरणी- 

 

- सिंधुदुर्ग किल्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी सन 1664-67 च्या दरम्यान केली. 
- असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. 
- ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळा खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. 
- पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.

 

धारदार खडकावर उभा आहे हा किल्ला-

 

- या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे.
- तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. 
- हा किल्ला वास्तुकलेचा अद्भुत नमूना आहे. भिंतीला चौफेर बुरूज आहेत. 
- बुरूज व तटबंदी मजबूत असल्याने शत्रूंना येथे कधीही काही हाताला लागले नाही.
 
वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे स्पॉट-

 

- वॉटर स्पोर्ट्ससाठी हे ठिकाण खूपच प्रसिद्ध आहे. याला महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया सुद्धा म्हटले जाते.
- काही दिवसापूर्वी एक समुद्री जैव अभ्यासक सारंग कुलकर्णी यांची येथील समुद्री जीवनावर एक डॉक्यूमेंट्री फिल्म बनवली होती.
- यानंतर राज्य सरकारने तेथे विविध आधुनिक सुविधा विकसित करण्याचे ठरवले आणि तेथील परिसर पर्यटनस्थळात बदलले. 
- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे बीच रिसोर्टवर वॉटर स्पोर्ट्सच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

 

कले जाल या किल्लावर?

 

- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात प्रमुख रेल्वे स्टेशन सावंतवाडी रोड आहे. जे कोकण रेल्वेमार्गावरून दिल्ली, मंगलौर, मडगांव व मुंबईला जोडलेले आहे.
- याच मार्गावर कणकवली एक प्रमुख स्टेशन आहे. सिंधुदुर्ग स्टेशन सावंतवाडी रोड-मडगाव सेक्शनवर आहे. तुम्हाला हवा तसा मार्ग निवडू शकता. 
- महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून येथे जाण्यास बस मिळतात. विमानाने जायचे झाल्यास गोव्यातील पणजीवरून तुम्हाला जवळ पडू शकते. तसेत तुम्ही येथे मोटर बोट्स आणि नावेचाही वापर करू शकता.

 

पुढे स्लाई़डद्वारे पाहा, या किल्ल्याचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...