आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Navys New Stealth Destroyer Ins Visakhapatnam Launched In Mumbai

युद्धनौका आयएनएस विशाखापट्टनमचे जलावतरण, अणुहल्ल्यांना देणार चोख उत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील सर्वात मोठी आधुनिक युद्धनौका आयएनएस विशाखापट्टनमचे सोमवारी मुंबईत जलावतरण करण्यात आले. भारतीय नौदलात 2018 मध्ये दाखल होणाऱ्या नौकेला प्रथमच समुद्रात उतरवण्यात आले. अणुअस्त्र, क्षेपणास्त्रांचा सामना करण्याची नौकेत क्षमता आहे.
नौदलाचे डिझाइन डायरेक्टर जनरल रियर अॅडमिरल ए.के. सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोटल अॅटमॉसफियर कंट्रोल सिस्टिम (टीएसी) मुळे या नौकेत येणारी हवा अणुबॉम्ब, रासायनिक आणि जैविक फिल्टरमधून येईल. फक्त नौकेच्या मशिन भागात असे सिस्टिम लावण्यात आलेले नाही, उर्वरित सर्व भाग त्याने व्यापलेला आहे. युद्धाच्या वेळी मशिन विभागात जाताना सैनिकांना विशेष मास्क दिला जाईल. याच श्रेणीच्या आणखी तीन युद्धनौका दर दोन वर्षांच्या अंतराने नौदलाला देण्यात येणार आहेत.