आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Naxalites Use Now Social Networking, Say R.R. Patil Confession

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल नेटवर्किंगचा नक्षलवाद्यांकडून वापर, आर. आर. पाटील यांची कबुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नलक्षवादी आपल्या चळवळीला पाठिंबा मिळवण्यासाठी सोशल साईट्सचा वापर करत असून त्यासाठी फेसबुकचा सर्रास वापर होत आहे, अशी धक्कादायक कबुली गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तरात दिली.


प्रवीण पोटे-पाटील यांनी नक्षलवादी करत असलेल्या सोशल साईट्सच्या वापराबाबत शुक्रवारी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात नक्षलवादी कारवाया गतीमान झाल्या आहेत. राज्यातील तरुणांमध्ये माओवादी विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी नक्षलवादी सोशल साईट्सचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी फेसबुकचा सर्रास वापर करण्यात येत आहे, असे पाटील या वेळी म्हणाले.


अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अन्वये कारवाई करण्यात येत आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यात 4 ठिकाणी सायबर इन्व्हेस्टिगेशन सेल स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती पाटील यांनी या वेळी दिली.


अधिवेशनाचे सूप वाजले
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची शुक्रवारी सांगता झाली. तीन आठवड्याच्या या अधिवेशनात विधान परिषदेत 25 तासाचा वेळ वाया गेला, 75 तासच कामकाज होऊ शकले. 15 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान अधिवेशनात मंत्री उपस्थित नसल्यामुळे 50 मिनिटाचे कामकाज वाया गेले.


31 हजार शेतक-यांच्या पीक कर्जाची पुनर्रचना
राज्यातील 31 हजार 211 शेतक-यांच्या पीक कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात रुपांतर करण्यात आले आहे. या बदलांमुळे शेतक-यांना तीन हप्त्यात कर्जफेडीची मुभा मिळाली आहे, अशी माहिती सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तरात दिली. अमरसिंह पंडित, रणजीत पाटील, विनोद तावडे, भाई गिरकर यांनी याबाबत शुक्रवारी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. पाटील म्हणाले, राज्यातील एकूण 31 हजार 211 शेतक-यांकडील पीक कर्जाचे रुपांतर झाले आहे. अन्य जिल्हा बँकांमार्फत पीक कर्जाची पुनर्रचना करण्याची कार्यवाही सुरू आहे.