आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठ्यांच्या इतिहासाला एनसीईआरटीने डावलले : फडणवीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्‍ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) तयार केलेल्या शालेय पाठ्यपुस्तकांत मराठ्यांचा इतिहास अत्यंत संक्षिप्त प्रमाणात दिला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासावर हा अन्याय असल्याचे सांगत भाजपने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.


या आंदोलनांतर्गत 19 सप्टेंबरपासून राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व पुतळ्यांशेजारी भाजप निदर्शने करणार आहे. तसेच गणेशोत्सवातही याबाबत जनजागरण केले जाणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. इयत्ता 6 ते 12 पर्यंतची एनसीईआरटीची इतिहासाची 10 पुस्तके आहेत. त्यातील एकूण 2, 100 पानांपैकी मराठ्यांच्या इतिहासाला दीड पान देण्यात आले आहे. त्याचवेळी सुलतान आणि मुघल इतिहास मात्र सविस्तर मांडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. खरा इतिहास दडवण्यामागे यूपीए सरकारचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला.

आक्षेप कशाला? : बाजीराव पेशवे, अहिल्याबाई होळकर, सदाशिव भाऊ, रघोजी भोसले यांचा उल्लेख एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांत नाही. शिवाजी महाराजांचे चित्रही नाही. महाराष्ट्रातील संताची दखल तर नाहीच, परंतु महाराष्ट्रातील समाजसुधारणा आणि प्रबोधनाच्या चळवळीलाही एनसीईआरटीने अनुल्लेखाने मारल्याचा भाजपचा दावा आहे.