आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncome Tax Notice To Gopinath Munde On Poll Expenditure Remark

गोपीनाथ मुंडेंना प्राप्तीकर विभागाची नोटीस; आठ दिवसांत मागितला खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे निवडणूक खर्चाच्या जाहीर वक्त्यव्याने चांगलेच अडचणीत सापडत चालले आहेत. निवडणूक आयोगाने मुंडेना कारणे दाखवा नोटीस बजावलेली असतानाच आता प्राप्तीकर विभागानेही त्यांना नोटीस पाठवली आहे. एक आठवड्यात या नोटीशीला उत्तर देण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. मुंडेंना नोटीस पाठवल्याच्या वृत्ताला प्राप्तीकर विभागाच्या उच्चाधिका-यांनीही दुजोरा दिला आहे.

प्राप्तीकर विभागाच्या अधिका-याने सांगितले की, मुंडे यांनी 2009 मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. या निवडणूकीत त्यांनी 8 कोटी रुपये खर्च केल्याचे वक्तव्य केले होते. त्याच 8 कोटींचा खुलासा मागण्यात आला आहे.

गोपीनाथ मुंडे यांनी 27 जून रोजी मुंबईतील एका कार्यक्रमात निवडणुकीचा खर्च प्रचंड वाढल्‍याचे सांगताना स्‍वतःच्‍याच खर्चाची माहिती दिली. ते म्हणाले की, मी 1980 मध्ये प्रथम आमदारकीची निवडणूक लढवली तेव्हा केवळ 29 हजार रुपये खर्च आला होता. त्यापैकी 22 हजार रुपयांचा निधी पक्षाकडून आला. मला फक्त सात हजार रुपये खर्च करावे लागले होते. मात्र गेल्या लोकसभा निवडणूकीत मला 8 कोटी रुपये खर्च करावे लागले.

मुंडेंच्‍या या वक्तव्‍यानंतर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रीया उमटल्‍या होत्या. राज्‍याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही मुंडेच्‍या वक्तव्‍याची चौकशी करण्‍याची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेऊन त्यांना खर्चाचा तपशील मागितला आहे.
गृहमंत्री पाटील यांनी मुंडे यांना पुन्‍हा निवडणूक लढविण्‍याची परवानगीच देऊ नये, यासंदर्भात निवडणूक आयोगाने निर्णय घ्‍यावा, असे म्हटले आहे.