आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण बैठकीला राष्ट्रवादी गैरहजर, राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने मराठा व मुस्लिम आरक्षणाला दिलेल्या स्थगितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गैरहजर होते. राज्य सरकार या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर सांगितले.

आघाडी सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम आणि मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. बैठकीला उपस्थित सूत्रांनी सांगितले की, बैठकीत सगळ्यांचाच मराठा आरक्षण झालेच पाहिजे, असा सूर होता. राज्य सरकार ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण कसे देऊ शकते हे न्यायालयात सिद्ध करता आले पाहिजे. तसेच मराठा समाजातील आकडेवारी पुरेशी नसल्यानेच न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयात प्रतिवाद करताना पुरेशा तयारीने गेले पाहिजे, असे महाधिवक्ते दरायस खंबाटा यांनी यावेळी सांगितले.

आरक्षण हे गरीब मराठ्यांसाठी असल्याचा मुद्दा योग्यरीत्या मांडला न गेल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. तर िवनायक मेटे यांनी हिवाळी अधिवेशनात या संदर्भात नवीन विधेयक मांडावे, अशी मागणी केली. आता तरी सरकारने नीट अभ्यास करून युक्तीवाद करावा, असे शिवसेना नेते दिवाकर रावते म्हणाले.
पुढे वाचा., आरक्षणावरून शिवसेनेचा भाजपवर आरोप...