आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादीची 8 जिल्हा परिषदांमध्ये सत्तेसाठी आघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला असला तरी काँग्रेस व राष्ट्रवादी काही ठिकाणी सत्तेच्या जवळ आहेत. त्यामुळे या दोन्ही  पक्षांनी सत्तास्थापनेसाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला. 
 
सिंधुदुर्गात काँग्रेसला बहूमत अाहे तर रायगडात राष्ट्रवादी व शेकापचा अध्यक्ष हाेणार अाहे. नगर, पुणे, सातारा, नांदेड, परभणी, उस्मानाबाद  येथे दाेन्ही काॅंग्रेस एकत्र अाल्यास त्यांचा अध्यक्ष हाेऊ शकताेबीड, कोल्हापूर, सांगली, हिंगोली, सोलापूर, अमरावती येथे समविचारी पक्षांना तसेच अपक्षांना एकत्र घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी अाघाडीची चाचपणी सुरू आहे.   

 नांदेडमध्ये काँग्रेसला २८,  राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्याने  येथे आघाडीचाच अध्यक्ष होणार आहे. परभणीत राष्ट्रवादीला २४ , तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या आहेत. उस्मानाबादला राष्ट्रवादीने २६, तर काँग्रेसने १३ जागा जिंकल्याने आघाडीचा अध्यक्ष बसेल. बीडमध्ये ६० पैकी २५ जागा राष्ट्रवादीने, काँग्रेसचे ३, भाजपचे १९ व शिवसेनेचे ४ सदस्य निवडून आले आहेत. येथे समविचारी अपक्षांना बरोबर घेऊन आघाडीची सत्ता स्थापन करण्याचा विचार सुरू आहे.
 
सांगलीतही ६० पैकी १४ राष्ट्रवादी, तर काँग्रेसने १० जागा जिंकल्या आहेत. येथे भाजप २३ जागांसह प्रथम क्रमांकावर असून शिवसेनेच्या खात्यावर ३ जागा असून भाजप व शिवसेनेची युती न झाल्यास अपक्ष तसेच समविचारी विचारांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा विचार आघाडी करत आहे.    
 
आघाडीची चर्चा सुरू- तटकरे 
काँग्रेसबरोबर आमची आघाडीची चर्चा सुरू आहे. चार दिवसांत आघाडी होईल हे निश्चित. समविचारी पक्षांनाही सोबत घेण्याचा विचार सुरू आहे. काँग्रेसचे नेते आघाडीसाठी सकारात्मक आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...