आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP And Congress Seat Sharing Conflicts Still Going On, Maharashtra

राष्ट्रवादी 130, तर काँग्रेसला 158 जागा; आघाडीचा फॉर्म्युला ठरला, घोषणा बाकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे जागावाटप सूत्र ठरल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. राष्ट्रवादीला 16 वाढीव जागा देण्यास काँग्रेस राजी झाली असून, आता राष्ट्रवादी 130, तर काँग्रेस 158 जागांवर लढणार आहे. 144 जागा मागणाऱ्या राष्ट्रवादीने ही तडजोड मान्य केल्याची माहिती खुद्द शरद पवार यांनीच पक्षाच्या बैठकीत दिली. या सूत्राला काँग्रेस श्रेष्ठींकडूनही हिरवा कंदील मिळाल्याचे समजते.
राष्ट्रवादीने 114 जागांसाठी मुलाखती घेण्याचा शब्द काँग्रेसला दिला, प्रत्यक्षात 288 जागांवरील इच्छुकांना बोलावले. यामुळे काँग्रेसने 120 पेक्षा जास्त जागा देणार नसल्याचे पत्रपरिषद घेऊन सुनावले. त्यातच बुधवारी मुलाखती आटोपल्यावर पवार यांनी पक्षाची बैठक घेऊन 130 जागा मिळत असल्याचे सांगितले.

नेते,पदाधिकारी अडून : सद्य:स्थितीत राष्ट्रवादीच्याच जास्त जागा निवडून येतील. तेव्हा कमी जागा घेतल्यास चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे पदाधिकाऱ्यांचे मत होते.

पवारांकडून समजूत :
आघाडीत तडजोड करावी लागते. गेल्या वेळच्या 114 वर 16 जागा वाढून मिळाल्या हेही कमी नाही. लोकसभेतील पराभवाने दोन्ही काँग्रेसला धडा मिळाला आहे. आता धोका पत्करण्याची तयारी नाही, अशी समजूत पवारांनी काढली.

काँग्रेसचीही मंजुरी?
काँग्रेससंसदीय मंडळात 115 पेक्षा जास्त जागा देऊ नयेत, असा सूर निघाला. मात्र 130 जागा दिल्यास आघाडी शक्य नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले जागावाटपावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब झाले.