आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीचा मोदी-शहांवर हल्लाबोल, शहांच्या खिशात कायम डायरी : पवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या िखशात एक डायरी असते आणि त्यात ते कोणता खटला केव्हा कुठे आहे, याची नोंद ठेवतात, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहा यांच्यावर हल्ला चढविला आहे. राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत सर्वच
प्रमुख नेत्यांची भाषणे झाली, मात्र ही सभा गाजवली ती राष्ट्रवादीची मुलूखमैदानी तोफ छगन भुजबळ यांनीच.

शहा यांनी अलीकडेच मुंबईत येऊन काँग्रेस आघाडीवर घोटाळेबाज असल्याचा आरोप करत हल्ला चढवला होता. त्याला उत्तर देताना पवारांनी माजी सरन्यायाधीशांनी शहा यांच्या बाजूने निकाल दिल्यानेच त्यांना

राज्यपालपदाची बक्षिसी दिल्याचा आरोप केला जात असल्याचे सांिगतले.
"सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना पदाची शपथ देतात. मात्र, आता सदाशिवन हे केरळचे राज्यपाल म्हणून त्याच राष्ट्रपतींकडून िनयुक्तिपत्र घेऊन गेले आणि केरळच्या मुख्य न्यायाधीशांकडून पदाची शपथ घेतील,'अशा शब्दांत पवारांनी भाजपवर हल्ला चढविला. अलीकडेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्यांची फारशी चर्चा नको, असे सांगतानाच कालपर्यंत भाजप व संघ परिवारावर टीका करणाऱ्या या नेत्यांचे दसरा मेळाव्यात खाकी हाफ पँट व काठी घेतलेल्या फोटोंची वाट पाहतोय, अशा शब्दांत पवारांनी या नेत्यांना टोला लगावला.

पंकजाला मंत्री कुठे केले? : भुजबळ