आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हम नकल से नही, अकल से काम करते है- राष्ट्रवादीचा काँग्रेसला टोला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी सरकारने दोन दिवसातच वीज दर 50 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, मुंबईतही अशा प्रकारची मागणी करणारे काँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांचा राष्ट्रवादीने खरपूस समाचार घेतला आहे. हम नकल से नही, अकल से काम करते है अशा शब्दांत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी निरूपम यांना टोला लगावला आहे.
एका पत्रकार परिषदेत मलिक म्हणाले, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी विजेच्या दराबाबत फेरविचार करण्यासंदर्भात दोन महिन्यापूर्वी सूचना केल्या आहेत. त्यानंतर राज्य सरकारने नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली समिती वीजदराबाबत निर्णय घेणार आहे. मुंबईत बेस्ट, रिलायन्स, टाटा पॉवर व टोरन्ट कंपन्या वीज पुरवतात. मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणारी बेस्ट ही निमसरकारी कंपनी आहे. इतर तीन खासगी कंपन्या आहेत. दिल्लीत केजरीवाल यांनी रिलायन्स व टाटा पॉवर या कंपन्यांचे कॅगद्वारे ऑडिट करण्याची मागणी केली आहे. कारण दिल्लीत या कंपन्या सरकारी भागीदारीत आहेत.