आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ncp Blame On Nitin Gadkari On Issue Port Trust Land, Also Critics On Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा मोदी-गडकरींचा डाव– NCP

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रीय भुपृष्ठ मंत्री नितीन गडकरी मुंबईतील पोर्ट ट्रस्ट हलवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टप्रमाणे देशातील अन्य पोर्टही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. देशातील बहुंताश पोर्ट ट्रस्टच्या जागा शहराच्या मध्यभागी आहेत. या जागांची किंमत लाखो कोटी रूपयांत आहे. त्यामुळे ही पोर्ट ट्रस्ट हलवून ही सगळी जागा बिल्डरांच्या घशात टाकण्याचा प्रयत्न गडकरींकडून सुरु झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. मात्र, मोदी सरकारचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही दिला.
राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मलिक यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण, प्रवक्ते हेमराज शहा, संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो आदी उपस्थित होते.
मलिक म्हणाले, शिवसेना मुंबई पोर्ट ट्रस्ट, भूमी अधिग्रहण बिल आणि जैतापूरबाबत वरवरचा विरोध करते आहे. फक्त 'सामना'मध्ये बातमी छापून आणण्याइतपतच त्यांचा विरोध उरला आहे. वास्तविक भाजपच्या धोरणांशी सहमती असल्याचेच शिवसेनेच्या काही नेत्यांनी वक्तव्यांतून दाखवले आहे. वरकरणी दोन्ही पक्षांत वाद सुरू असल्याचे दिसले, तरी आतून त्यांचे सर्वकाही चांगले चालले आहे. जनतेला भूलथापा देण्यासाठीच शिवसेना खोटा विरोध करते आहे असा टोला मलिक यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मलिक म्हणाले, काही दिवसांपासून देशात मुस्लिमविरोधी वातावरण निर्माण केले जात होते. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी दोन दिवसापूर्वी मुस्लिमांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. अल्पसंख्यांकाच्या मदतीसाठी आपण अर्ध्या रात्री उठून येऊ, असे आश्वासनच मोदींनी शिष्टमंडळाला दिले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पक्षातच मुस्लिमांना किती स्थान दिले ते आधी पहावे. भाजपची सत्ता 11 राज्यांत आहे. यातील काश्मीर सोडले तर एकाही राज्यात भाजपचा मुस्लिम आमदार नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात एक सोडला तर दुसरा मंत्री नाही. मोदींजीना आमचे आवाहन आहे की, मुस्लिमांसाठी काही करायचे असेल, तर प्रत्येक राज्यात दोन मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी द्या. आम्ही त्यांना बिनविरोध निवडून आणू, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
मुस्लिम तरुणांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात कॉम्प्युटर असावा, अशा आशावाद नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, आयटी क्षेत्रात सर्वात जास्त संख्या मुस्लिम तरुणांची आहे. मुस्लिम तरुणांना काही द्यायचे असेल तर, त्यांना एससी आणि एसटीप्रमाणे केजी टू पीजी शिक्षण मोफत द्यावे. ही मागणी आम्ही अर्ध्या रात्री करत नसून दिवसाढवळ्या करतोय. मोदींनी या मागणीचा विचार कारावा. त्यांना जर खरोखऱच सबका साथ सबका विकास करायचा असेल, तर त्यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, असे आवाहन मलिक यांनी केले.
मुस्लिम असल्याने नोकरी नाकारण्यात आलेल्या झिशानला अदानी ग्रुपमध्ये नोकरी देऊन आणि मुस्लिम शिष्टमंडळाची भेट घेऊन पंतप्रधान मोदी डॅमेज कंट्रोल करू पाहत आहेत. आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण मंजूर केले होते. त्याला न्यायालयानेही मान्यता दिली होती. परंतु सेना-भाजप सरकारने ते रद्दबातल केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅटर्नी जनरलचे मत जाणून घेण्यासाठी थांबले आहेत. ते वकील आहेत. त्यांना माहिती असायला हवे की, कोर्टाने एकदा मान्यता दिल्यावर त्याचे कायद्यात रुपांतर व्हायला हवे होते. मोदींजींना जर खरोखरच अल्पसंख्यांकांची चिंता वाटत असेल, तर त्यांनी या आरक्षणाला मान्यता देण्यासाठी राज्य सरकारला सूचना द्याव्यात असेही नवाब मलिक म्हणाले.
पुढे वाचा, दलितांना पुन्हा गावकुसाबाहेर काढण्याचा सरकारचा डाव...