आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Chief Sharad Pawar To Chat Live Today From 4 6 Pm On Facebook

फेसबुक \'लाईव्ह चॅट\'द्वारे आज 4 वाजता शरद पवार संवाद साधणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवारांना समस्या, प्रश्न विचारण्यासाठी 'लाइव्ह चॅट'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी पक्षाने केले आहे. - Divya Marathi
शरद पवारांना समस्या, प्रश्न विचारण्यासाठी 'लाइव्ह चॅट'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी पक्षाने केले आहे.
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सायंकाळी 4 ते 6 या वेळेत तरूणांशी फेसबुकच्या माध्यमातून 'लाइव्ह चॅट'द्वारे संवाद साधणार आहेत. तरूणांशी संवाद साधण्याचे निमित्त असले तरी या कार्यक्रमात सर्वजण सहभागी होऊ शकतात.
महाराष्ट्रातील कृषीक्रांतीचे जनक म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे पाहिले जाते. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण देशपातळीवर कृषी क्षेत्रात केलेल्या अत्यंत भरीव कार्यामुळे त्यांचे नाव कृषीक्षेत्राशी कायमचे जोडले गेले आहे. एक जुलै ही त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषीदिन म्हणून साजरी केली जाते. नेमका हाच मुहूर्त साधून पवारांनी सोशल मिडियाद्वारे संवाद साधण्याचे ठरविले आहे.
तरूण-तरूणींनी, शेतक-यांनी व सामान्यांनी आपले प्रश्न, समस्या थेट पवारसाहेबांना विचारण्यासाठी 'लाइव्ह चॅट'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी पक्षाने केले आहे.
प्रगतीचा मार्ग हा परस्परांशी संवादांतून जातो. संवादातूनच एकमेकांच्या अडी-अडचणी समजतात, त्यांच्यावर मार्गही शोधता येतो. संवादातूनच हे सगळे शक्य होत असल्याने संवाद घडणे अतिशय महत्त्वाचे असते. आज बदलत्या जगात संवादाची माध्यमेही बदलत चालली आहेत. सोशल मीडिया आज संवाद साधण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम ठरते आहे. आजच्या तरुणाईशी संवाद साधण्यास मीसुद्धा उत्सुक आहे. त्यामुळेच मी तुमच्याशी फेसबुक लाइव्ह चॅटच्या माध्यमातून संवाद साधण्याचे ठरवले आहे. तेव्हा भेटू आणि चर्चाही करू, अशी साद शरद पवारांनी घातली आहे.
पुढे पाहा छायाचित्र, कृषिदिनी खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली शेतकरी महिलेची भेट...