आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहकारमंत्र्यांना तुरुंगातच टाका, काँग्रेस- राष्ट्रवादीची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - साेलापुरातील भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष देशमुखांचा सहकार मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी डाेकेदुखीच ठरण्याची चिन्हे अाहेत. अधिवेशनात विराेधकांनी देशमुखांवर केलेले भ्रष्टाचाराचे अाराेप खोडून काढत मुख्यमंत्र्यांनी त्यांनी क्लीन चिट दिली असली तरी ‘सेबी’च्या अादेशामुळे मात्र देशमुख व मुख्यमंत्र्यांपुढील अडचणीत वाढ झाली आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीने देशमुख यांच्या राजीनाम्याची व त्यांना तुरुंगातच टाकण्याची मागणी केली अाहे.

देशमुख यांनी लोकमंगल अॅग्रो नावाची कंपनी काढून साखर कारखाना उभारण्याचे ठरवले. यासाठी चार हजार ७५१ गुंतवणूकदारांकडून ७४ कोटी ८२ लाख रुपये जमा केले. नियमाविरुद्ध पैसे जमा केल्याने सेबीने लोकमंगलला नोटिस पाठवून गुंतवणूकदारांचे पैसे सव्याज परत देण्याचा आदेश दिला आहे. या बातमीने राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील आणि धनंजय मुंडे यांनी सुभाष देशमुखांच्या भ्रष्टाचारावर सरकारला घेरले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिली होती. आता मुख्यमंत्री पुन्हा त्यांना क्लीन चिट देणार का असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

पुढे वाचा, सुभाष देशमुखांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : सचिन सावंत
बातम्या आणखी आहेत...