आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Congress On College And University Level Election Issue

महाविद्यालयांमध्ये निवडणूका झाल्या पाहिजे - राष्ट्रवादीची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाविद्यालय स्थरावरील राजकारणातून देशात आणि राज्यातही अनेक नेते पुढे आले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा खंडीत झाली आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठ विद्यार्थी संसदेसाठीच्या निवडणूका राज्यात अनेक वर्षांपासून बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राजकारणाविषयी आवड निर्माण होण्याएवजी तेढ व राजकारण हे वाईट हा समज निर्माण झाला आहे. नवी पिढी राजकारणात यावी असे वाटत असेल तर महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये पुन्हा निवडणूका सुरु करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

दिल्ली, केरळसह अनेक राज्यांत महाविद्यालयांमध्ये निवडणूका घेतल्या जातात मग महाराष्ट्रातच बंदी का आहे, असा सवाल त्यांनी एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपस्थित केला आहे.महाविद्यालयांच्या राजकारणात माफिया आणि दिग्गज राजकारणी लक्ष देऊ लागल्यानंतर या निवडणूकांना वेगळे वळण लागले. त्यामुळे लोकशाही मार्गाने विद्यार्थी प्रतिनिधींची निवड बंद करून गुणवत्तेच्या आधारावर केली जाऊ लागली.

महाविद्यालयामध्ये निवडणूका सुरु करण्यास काँग्रेससह शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अनेक वर्षांपासून विद्यार्थी संघटना या महाविद्यालयांमध्ये निवडणूकीने विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करावी अशी मागणी करीत आहेत. आता, सत्तेत भागीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षांनी ही मागणी केल्यामुळे महाविद्यालयांमध्ये पुन्हा गुलाल उधळला जाईल का अशी चर्चा सुरु झाली आहे.