आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीला ती चूक परत करायची नाही, आता हवे अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजप व शिवसेनेतील वाद शमण्याची शक्यता दिसत असतानाच आता आघाडीतील जागावाटपाने चांगलाच पेट घेतला आहे. राष्ट्रवादीने 144 जागांची मागणी करतानाच अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद हवे आहे. 2004 साली जी चूक केली त्याची राजकीय किंमत आम्ही मोजत आहोत. पुन्हा अशी चूक करायची नाही असा निर्धार राष्ट्रवादीने काँग्रेसने व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांच्या नेत्यांत आज सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री चव्हाण यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक झाली. त्यात काँग्रेसने 124 जागा देऊ असे सांगितले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक झाली. यात नेत्यांनी राज्यात बरोबरीची सत्ता हवी असे मत व्यक्त केल्याची सूत्रांनी माहिती दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीची काही नेत्यांनी 2004 साली पक्षाने मुख्यमंत्रीपद न स्वीकारून फार मोठी राजकीय चूक होती. त्यावेळी राष्ट्रवादी राज्यातील सर्वात मोठा पक्ष होता. त्यावेळी पक्षाने मुख्यमंत्रीपद स्वीकारले असते संघटना वाढीसाठी सुवर्णसंधी होती. त्यानंतर 2009 नंतर राज्यातील राजकीय स्थिती बदलत गेली व पक्षाच्या वाढीला फटका बसला. त्यामुळे आता यापेक्षा आणखी काही गमविण्याची पक्षाला भीती नाही. काँग्रेसच्या जागा आपल्यापेक्षा कमी आहेत. हीच वेळ आहे ती राज्यात काँग्रेससोबत बरोबरीच्या जागा मागण्याची आणि आपली ताकद दाखविण्याची व वाढविण्याची. त्यामुळे आगामी विधानसभेत 144 जागांवर ठाम राहावे. ज्या अपक्ष आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यात जागा पक्षाला सोडल्या जाव्यात. तसेच अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद घ्यावे. जेणेकरून आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सामाजिक पातळीवरील कामे करता यावीत, असा राष्ट्रवादीच्या दादा नेत्यांनी प्रस्ताव दिला. या मागण्या मान्य होणार नसतील तर यंदाची निवडणुक पक्षाने स्वतंत्र लढावी असेही या नेत्यांनी सर्वासमोर सांगितले.
मात्र, सध्या देशातील व राजकीय स्थिती आपल्यासाठी प्रतिकूल स्थिती आहे. अशा स्थितीत जास्तीच्या अपेक्षा ठेवण्यापेक्षा धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळून एकत्र निवडणुकीला सामोर जावे असे काहींनी सुचवले. त्याला शरद पवार, भुजबळ, आर आर पाटील यांनी पसंती दिली.
दुसरीकडे, काँग्रेसने राष्ट्रवादीच्या सर्व अटी फेटाळून लावल्या आहेत. राष्ट्रवादीने केलेल्या मागण्यांची व अटींची माहिती दिल्लीत हायकमांडला देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादीला आम्ही 124 जागा देऊ शकतो. यापेक्षा अधिक जागा देण्याचा प्रश्नच येत नाही. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीसोबत आमची आघाडी व्हावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र, राष्ट्रवादी अशी आडून राहिल्या आमचा नाईलाज होईल व आम्हाला स्वबळावर लढावे लागेल. आघाडी तुटली तर राष्ट्रवादीने आम्हाला जबाबदार धरू नये, असेही ठाकरेंनी म्हटले आहे.