आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Demands To Arrest Shivsena Mp\'s Who Is Involved In Sadan Issue

ही तर शिवसेनेची संस्कृतीच, त्यांच्या खासदारांना तत्काळ अटक करा- राष्ट्रवादीची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- नवाब मलिक)
मुंबई- रोजा असतानाही शिवसेनेच्या खासदारांनी बळजबरीने एखाद्याला खायला लावणे, हा धार्मिक भावना भडकावण्याचा प्रकार आहे. या बाबत निवासी आयुक्तांनी पोलिस स्टेशनात गुन्हा नोंदवावा व दोषी खासदारांना अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही मागणी केली आहे. दरम्यानस दिल्लीतील महाराष्ट्र सदनात घडलेल्या या प्रकाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीतही शिवसेनेचे हे कृत्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच दोषींवर कठोर करावी असे राज्य सरकारची भूमिका असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये घडलेला हा प्रकार ही शिवसेनेची संस्कृती आहे. या बाबत निवासी आयुक्तांनी पोलिस स्टेशनात गुन्हा नोंदवावा आणि गुन्हेगारांना तातडीने अटक व्हावी, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे आदेश द्यावेत. ज्यांनी अशा प्रकारे धार्मिक भावना भडकावण्याचा गुन्हा केला आहे, त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई व्हायलाच हवी, असे मलिक यांनी म्हटले आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी शिवसेनेच्या खासदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच शिवसेनेच्या खासदारांच्या या कृत्याची दखल अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार चौकशी होऊ शकते. एकूनच हे प्रकरण शिवसेनेच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे.