आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांविरोधात वक्तव्ये केल्याने विनायक मेटेंना राष्ट्रवादीची नोटिस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात समज देऊनही वारंवार वक्तव्ये केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे आमदार विनायक मेटेंना नोटिस पाठवली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत नोटिस पाठवली असून, 8 दिवसात याचे समाधानकारक उत्तर द्या, नाहीतर कारवाई केली जाईल असे पत्रकात नमूद केले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार असलेले विनायक मेटे सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आंदोलन करून वणवा पेटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच मराठा आरक्षणाला भुजबळांसारख्या झारीतील शुक्राचार्याचा विरोध असल्याने राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देत नाही, अशी टीका केली होती. तसेच मागील काही काळापासून मेटे भुजबळ यांच्यावर सतत वेगवेगळ्या कारणाने टीका करीत आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी याची गंभीर दखल घेतली असून, पक्षात शिस्तप्रियतेला महत्त्व आहे. पक्षविरोधी वक्तव्ये खपवून दिली घेतली जाणार नाहीत असा कडक संदेश देण्यासाठीच मेटेंना नोटिस देण्यात आली आहे.