आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचा जाहीरनामा, वाचा जसाचा तसा: शेतमजूरांना पेन्शन तर विद्यार्थ्यांना लॅपटॉप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज मुंबईत विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी आर आर पाटील, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, सचिन आहिर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
काय आहेत राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील ठळक बाबी... पाहा...
- 5 वर्षात 55 हजर पोलिसांची भरती करणार
- एकून वीजनिर्मितीत 44 टक्के वाढ
- महिला बचत गटांना 4 टक्के दराने कर्ज
- 65 वर्षावरील अल्पभूधारकाला पेन्शन
- 60 टक्के शेती ठिबक आणि तुषार सिंचनानं हरित करणार
- पुढील काळात मागेल त्याला वीज
- 6 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या बारावी पास विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप व फ्री वायफाय
- प्रत्येकाला आरोग्य विमा
- जीवनदायी योजनेची रक्कम 3 लाखापर्यंत नेण्याचा प्रयत्न
- प्रत्येक जिल्हा विमानतळाने जोडणार
- अल्पसंख्याकाच्या विकासासाठी मौलाना आझाद मंडळाचा निधी 2 हजार कोटी करणार
- मुंबईत पोलिसांच्या घरांसाठी दहा एकर जागा उपलब्ध करून देणार
- ओबीसींच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय
- चैत्यभूमीत आंबेडकरांचे स्मारक, चिरागनगरात अण्णा भाऊ साठेंचे स्मारक तर अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक
- शेतमजूरांना पेन्शन, शेतक-यांसाठी कवच कुंडल विमा योजना
- औरंगाबाद, नाशिक, नागपूरात येथे मोनोरेल उभारणार-
- स्टेट वॉटर कॉरिडॉर प्रकल्प राबविणार
- विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविण्यासाठी विशेष प्रयत्न
- 1000 किमाचे राज्य महामार्ग बनविणार
- एसटी बस स्थानकांत 20 रूपयांत आहार उपलब्ध करून देणार
पुढे स्लाईडच्या माध्यमातून पाहा आणि वाचा, राष्ट्रवादीचाा सविस्तर जाहीरनामा...