आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीची आज बैठक: सातारा, बुलडाणा, नाशिक आणि माढावर विशेष लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेसवर दबाव आणून 22 जागा पदरात पाडून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता सर्वच जागांवर बलाढ्या उमेदवार देण्याची तयारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर उमेदवार निवडीसाठी मॅरेथॉन बैठका होणार असून रविवारी पक्षाची अंतिम यादी तयार होण्याची शक्यता आहे.
केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरात मोदी लाट आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद वाढवण्याकडे लक्ष दिले आहे. राज्यात जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याची रणनीती आखण्यात येत आहे. दिल्लीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास राज्यातील जास्त खासदार संख्येच्या बळावर शरद पवारांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे वजनदार नेत्यांनाच लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा राष्‍ट्रवादी चा मानस आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी देवगिरी बंगल्यावर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासह वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहाणार आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी संबंधित विभागातील राष्ट्रवादीच्या अधिकार्‍ यांकडून एक अहवाल मागवण्यात आला आहे. या बैठकीत त्याचा अभ्यास केला जाणार आहे. शनिवारी सकाळी 9.30 ते 10.45 दरम्यान बुलडाण्याबाबत चर्चा होणार आहे. दुपारी अडीच ते चार वाजेपर्यंत माढा जागेबाबत, तर रविवारी सकाळी 9.30 ते 11.30 पर्यंत सातार्‍याबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर नाशिक आणि दिंडोरीबाबत चर्चा होईल. दोन ते चारदरम्यान 22 मतदारसंघाची आढावा घेतला जाणार आहे.
मोहितेंचे पारडे जड
माढा मतदारसंघातून विजय सिंह मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांची नावे चर्चेत आहेत मात्र मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. सातार्‍ यासाठी उदयनराजे भोसले यांचे नाव पुढे असून नाशिकमधून छगन भुजबळ यांना तिकिट दिले जाणार आहे. मात्र या दोन्ही जागा जिंकण्यासाठी काय करता येईल याची रणनिती बैठकीत ठरविली जाईल. दिंडोरीमधून मधुकर पिचड किंवा ए. टी. पवार यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाणार आहे.