आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या या MLAच्या पत्नीचे फोटो झाले व्हायरल; वाचा, का आली चर्चेत?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात महापालिका आणि ‍जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतराला जोर आला आहे. विलेपार्ले येथील काँग्रेसचे माजी आमदार विधायक कृष्णा हेगडे आणि त्यांचे मित्र अभिनेता दिलीप ताहिल भाजपच्या गोटात सामील झाले आहे.

दुसरीकडे, अमरावती या अनुसुचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या नवनीत कौर राणा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत अर्थात भाजपसोबत जवळीक वाढली आहे.
 
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी नवनीत कौर राणा यांचे मॉर्फ फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

पतीही ही करतील भाजपमध्ये प्रवेश...
नवनीत कौर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहे. त्यांचे पती रवी राणा हे देखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढविलेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमात चमकल्या नाही. आता पदवीधर निवडणुकीत त्यांनी भाजपला मदत करण्याचे ठरविले आहे. मात्र राष्ट्रवादीला सोडले असल्याचेही अधिकृत जाहीर केले नाही.

कोण आहेत नवनीत कौर राणा? 
- अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा विवाहापूर्वी साऊथच्या चित्रपटांमध्ये अॅक्ट्रेस होत्या. 
- सामुहिक विवाहसोहळ्यात त्यांनी आमदार रवी राणा यांच्यासोबत लग्न केले होते. 
- एका वृत्तवाहिनीशी बोलतानी नवनीत राणा यांनी आगामी पदवीधर निवडणुकीत भाजपसोबत असल्याचे सांगितले. 
- महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचे नवनीत कौर यांनी सांगितले. 
- त्या म्हणाल्या, 'रवी राणा दुसऱ्यांदा स्वबळावर आमदार झाले आहे, ते त्यांच्या कामामुळे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडनेरा मतदारसंघासाठी मोठा निधी दिला आहे.'
- 'आम्ही जनतेसाठी काम करतो. कोणत्याही पक्षासाठी किंवा व्यक्तीसाठी काम करीत नाही.'
- अमरावतीचा महापौर 'वाय.एस.बी'चाच होईल असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला. 
- राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आहे का या प्रश्नाचे नवनीत राणा यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. शरद पवार आणि अजित पवार यांचा आम्ही आदर करतो असे त्या म्हणाल्या. परंतू पदवीधर मतदारसंघात भाजपसोबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
- नवनीत राणा म्हणाल्या, भाजपला पाठिंबा दिला आहे तेव्हा रणजीत पाटील यांनाच आमचा पाठिंबा असणार आहे.
- रवी राणा तेव्हाही अपक्ष होते, आणि आजही अपक्ष आहेत. लोकसभेची निवडणूक नवनीत राणा कौर यांनी लढली होती.

महानगरपालिका आणि जिल्हा परिषदवर लक्ष
- शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे हा आमचा जिल्हापरिषदेसाठीचा अजेंडा राहाणार आहे.
- नोटबंदीकाळात सरकारकडे मोठ्या प्रमाणात काळापैसा जमा झाला आहे. आता सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमुक्त करावा. 
- विजय माल्याचे कर्ज माफ होत असेल तर शेतकऱ्यांचे का नाही, असा सवाल नवनीत राणा यांनी विचारला आहे. 
- नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर अमरावती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली होती. 
- राणा यांच्या निवडणुकी बँक खात्यात राष्ट्रवादी काँग्रेसने 50 लाख रुपये जमा झाल्यानेही त्या चर्चेत आल्या होत्या.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, राष्ट्रवादी प्रवेशापासून नवनीत-रवी राणा यांच्या लग्नापर्यंतचे फोटो..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...