आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छगन भुजबळांवर अन्याय तर चार वर्षापासून तुरुंगात असलेल्या सुरेशदादा जैनांचे काय?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवार आणि छगन भुजबळ (फाईल फोटो) - Divya Marathi
शरद पवार आणि छगन भुजबळ (फाईल फोटो)
मुंबई- छगन भुजबळ यांच्या अटकेनंतर राज्यभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असताना धुळ्यात भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या समर्थकांनी मात्र फटाके वाजवून, दुचाकी रॅली काढून या कारवाईचे स्वागत केले. आमदार गोटे यांनी यापूर्वीही वारंवार भुजबळांविरोधात आरोप करत कारवाईसाठी पाठपुरावा केला होता. मंगळवारी विधानसभेत आमदार गोटे यांनी भुजबळांना अटक केल्याच्या कारवाईचे जाहीर स्वागतही केले होते, त्यावर दोन्ही काँग्रेसच्या आमदारांनी गोंधळ घातला होता.
अनिल गोटे व भुजबळ यांच्यातील राजकीय हाडवैर राजकीय वर्तूळात सर्वश्रूत आहे. गोटे यांनी सन 1999 मध्ये शिवसेना-भाजपची पुन्हा सत्ता आणण्यासाठी केलेली राजकीय खेळी भुजबळ यांनी उधळून लावली होती. त्यावेळी समाजवादी पक्षात असलेले गोटे यांना तेलगीच्या बनावट नोटांच्या प्रकरणात भुजबळ यांनीच अडकवल्याचा आरोप केला जातो. या प्रकरणात गोटेंना 2003 मध्ये अटक झाली होती. चार वर्षे त्यांनी कारावास भोगला. मकोका कायद्यान्वये अजूनही खटला सुरू आहे. तर भुजबळ यांनाही 2003 मध्ये याच प्रकरणावरून उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसे हे दोघेही तेलगी घोटाळ्याचे संशयित होते.

राष्ट्रवादीचे राज्यातील विविध भागात आंदोलन-
भुजबळ यांना राजकीय हेतूने अटक करण्यात आल्याचा आरोप करीत राज्यातील विविध भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केली आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नगर, विदर्भातील बुलडाणा, देऊळगाव राजा, कोल्हापूर आदी सर्वत्र राष्ट्रवादीने आंदोलने केली.
मागील काही दिवसांपासून भाजप सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत राष्ट्रवादीच्या नेत्यांचे खच्चीकरण करत आहे. भुजबळ हे चौकशीसाठी तयार असताना, सखोल चौकशी करण्यात आली नाही. भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या सांगण्यावरून अशा प्रकारची कारवाई करण्यात येत असेल तर सरकारची भूमिका चुकीची आहे. ही घटना लोकशाहीला हरताळ फासणारी असून सरकार सूडाचे राजकारण करत आहे,' असा राष्ट्रवादीने केला आहे. नगर शहर जिल्ह्यातही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. विदर्भातील बुलडाणा, देऊळगाव राजा या शहरांतही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले. तसेच खासदार सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. कोल्हापूर शहराजवळील पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळे वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
पुढे वाचा, भुजबळांवर अन्याय तर चार वर्षापासून तुरुंगात खितपड पडलेल्या सुरेशदादांचे काय?...
बातम्या आणखी आहेत...