आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Leader Chaggan Bhujbal Discharged From St. George Hospital

छगन भुजबळांना रूग्णालयातून सुट्टी, आर्थर रोड जेलमध्ये पुन्हा रवानगी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनी लाँडरिंगप्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना आज दुपारी सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. भुजबळ यांची प्रकृती स्थिर असल्याने सेंट जॉर्ज रुग्णालयातून आज दुपारी दोनच्या सुमारास त्यांना डिस्चार्ज दिला गेला. भुजबळांची आर्थर रोड तुरुंगात पुन्हा रवानगी करण्यात आली. भुजबळ यांना 27 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी त्यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात येईल.
आज दुपारी शासकीय दंत महाविद्यालय सेंट जॉर्जमध्ये दातांची तपासणी केल्यानंतर भुजबळांना आर्थर रोड तुरुंगात धाडण्यात आले. छगन भुजबळ यांचा हार्ट रेट स्टेबल झाला आहे तसेच त्यांचे इतर अहवाल नॉरमल आले आहेत. त्यांच्या प्रोस्टेट ग्रंथीही वाढल्या होत्या मात्र आता त्या नियंत्रित आहेत, असे त्यांच्यावर उपचार करणारे मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. रोहन सिक्वेरा यांनी सांगितले.