आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्या, खुद्द भुजबळांनी वृत्त फेटाळले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भुजबळ यांच्यावर झालेल्या आरोपांत फारसे तथ्य नाही असे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून क्लीनचिट दिली होती. त्याआधी सार्वजनिक बांधकाम विभागानेही भुजबळांना क्लीनचिट दिल्याचा अहवाल सादर केल्याचे पुढे आले होते. दरम्यान, याच सर्व घडामोडींबाबत या विभागाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज दुपारी स्पष्टीकरण देणार आहेत.
दरम्यान, भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या वृत्तानंतर खुद्द छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना हे वृत्त फेटाळून लावले आहे. खासदार संजय राऊत यांनी लिहलेल्या पत्राबाबत राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. त्यांनी जी सत्य परिस्थिती आहे त्याचे कथन पत्रात केले आहे असे सांगत आपण राष्ट्रवादी सोडणार असल्याचे वृत्त चुकीचे आहे असे म्हटले आहे. शिवसेनेनेही या प्रकरणी कानावर हात ठेवले आहेत.
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार, शिवसेना व भुजबळांत कोणतेही राजकीय चर्चा सुरु नाही. तसेच भुजबळांवरील आरोपांबाबत शिवसेनेने त्यांना कोणतेही क्लीनचिट दिलेली नाही. संजय राऊत यांनी दिलेले पत्र त्यांचे वैयक्तिक स्वरूपाचे आहे. महाराष्ट्र सदन, कलिना भूखंड प्रकरणात भुजबळांवरील आरोप खरे की खोटे याची शिवसेनेला अद्याप माहिती नाही. त्यामुळे त्यांची बाजू घेण्याचा प्रश्नच नाही असे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.
भुजबळ राष्ट्रवादीतच, आम्ही त्यांच्या पाठीशी- तटकरे
छगन भुजबळ राष्ट्रवादीत आहेत व ते कायम राहतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. तटकरे म्हणाले, भुजबळ साहेब हे पक्षाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष आहेत. ते पक्षाचे आदरनीय व महत्त्वाचे नेते आहेत. ते इतर कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. त्यांच्यावर होत असलेले आरोप हे राजकीय आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी संपूर्ण पक्ष ताकदीने उभा राहील असे तटकरे यांनी सांगितले.
पुढे वाचा, भुजबळ राष्ट्रवादीत नाराज?
बातम्या आणखी आहेत...