आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील कोळी समाजाचे नेते दामोदर तांडेल शिवसेनेत, राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- दामोदर तांडेल)
मुंबई- मुंबईतील कोळी समाजाचे नेते व राष्ट्रवादीचे सरचिटणीस दामोदर तांडेल यांनी आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी भगवा हाती घेतला. उद्धव यांनी त्यांचे स्वागत हातात शिवबंधन बांधले. आगामी निवडणुकीत आपल्याला तिकीट नको आहे. पण आपल्या मागण्या न केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धडा शिकवू, असे तांडेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोळी समाजाचे मोठे नेते असलेले तांडेल यांनी मच्छिमार संघटनेच्या माध्यमातून कायमच आपल्या समाजाच्या विकासासाठी काम केले. मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष असताना त्यांनी आपल्याच सरकारविरोध आंदोलन करीत सरकारला धारेधर धरले होते. मासेमारी परवान्यांत गैरव्यवहार होत असल्याचे सांगून यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप त्यांनी केले होते. काँग्रेसचे मंत्री अनिस अहमद यांच्याविरोधात तर त्यांनी मोर्चाच उघडला होता. अखेर त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत सेनेला साथ देण्याचे जाहीर केले आहे.