आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतक-यांच्या पायावर नव्हे, रावसाहेब दानवेंच्या बुडावर गोळी मारायला हवी- धनंजय मुंडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- शेतक-यांच्या छातीवर नव्हे, पायांवर गोळ्या झाडायला पाहिजे होती, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अश्लाघ्य शब्दात टीका केली आहे. शेतक-यांवर नव्हे आता रावसाहेब दानवेंच्या बुडावरच आता गोळी मारण्याची वेळ आली आहे अशा शेलक्या धनंजय मुंडे यांनी दानवेंवर टीकास्त्र सोडले.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतक-यांच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या हल्लाबोल मोर्चादरम्यान मुंडे यांनी हे वक्तव्य केले. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात उपस्थित कार्यकर्ते व शेतक-यांना मार्गदर्शन करताना धनंजय मुंडे यांनी दानवेंचा खरपूस समाचार घेतला. 

 

मागील पंधरवड्यात नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात शेतक-यांनी ऊस आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी शेतक-यांवर गोळीबार केला होता. यात दोन शेतक-यांच्या छातीत गोळ्या लागल्या होत्या. या गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांची भेट घेतली होती. त्यानंतर दानवेंनी पोलिसांनी छातीवर नव्हे तर शेतक-यांच्या पायावर गोळ्या झाडायला हव्या होत्या असे वक्तव्य केले होते. त्याआधी मे महिन्यात तूर खरेदी केल्यानंतर, लाखो टन तूर डाळ खरेदी केली तर साले शेतकरी रडतात असे वक्तव्य दानवेंनी केले होते.

 

रावसाहेब दानवेंच्या या दोन्ही वक्तव्याचा संदर्भ देत धनंजय मुंडे यांनी खरपूस समाचार घेताना दानवेंच्या बुडावर गोळी मारण्याची वेळ आल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...