आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंत पाटलांनी नरेंद्र मोदींना बर्थ डेच्या निमित्ताने लिहले अनावृत्त पत्र, वाचा जसेच्या तसे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी 67 वर्षाचे झाले. आपला 67 वा वाढदिवस त्यांनी आपले गृहराज्य गुजरातमध्ये साजरा केला. रविवारी सकाळी त्यांनी सरदार सरोवराचे लोकार्पण केले व त्यानंतर आई हिराबेन यांचे आशीर्वाद घेतले. देशभर मोदींचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला. भाजपने हा सेवा दिवस म्हणून साजरा केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदींना एका अनावृत्त पत्र लिहले आहे. जयंत पाटील यांनी नेमके काय काय म्हटले आहे हे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय.
 
आमचा भ्रमनिरास झालाय!
 
प्रिय नरेंद्रभाई ,
 
सर्वप्रथम आपल्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा ..!! आज आपण 67 वर्षांचे झालात. वयाच्या 67 व्या वर्षी देशाच्या पंतप्रधानपदी असणं हि निश्चितच अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे.
एका अत्यंत सामान्य कुटुंबातून येवून भारतासारख्या खंडप्राय देशाचं पंतप्रधान होण हि काही साधी बाब नव्हे ! अर्थात यामागे तुमचे मोठे कष्ट आणि साधना आहेच. भारतासाख्या एवढ्या मोठ्या देशात प्रचंड मेहनत घेणारे आणि गुणवत्ता असलेले अनेक लोग असतात पण सर्वच लोक पंतप्रधान होऊ शकत नाहीत , पण तुम्ही तुमच्या कष्टानेच पंतप्रधान झालात. तुमचं अभिनंदन करायचं ते यासाठीच. रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करणारे डॉक्टर मनमोहन सिंह या देशाचे पंतप्रधान होतात, रेल्वे स्टेशनवर चहा विकणारे तुम्ही देखील या देशाचे पंतप्रधान झालात हे या देशाच्या लोकशाहीचे मोठे यश आहे.लोकसभेत पहिल्यांदा जाताना तुम्ही लोकशाहीच्या या मंदिराच्या पायरीवर माथा टेकवलात आणि लोकशाही पद्धतीने होणाऱ्या चर्चेवर आपला विश्वास आहे हे दाखवून दिलत.
 
26 मे 2014 रोजी जेव्हा तुम्ही या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतलीत तेव्हा या देशातील अगदी सामान्य कुटुंबापासून ते सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांपर्यंत सर्वांनी तो सोहळा डोळे भरून पाहिला. तुम्हाला शपथ घेताना पाहून या देशातील लाखो लोकांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. किती प्रचंड अपेक्षा होत्या लोकांच्या त्या क्षणाला तुमच्याकडून …!! अगदी एव्हरेस्ट एवढ्या !
 
पुढे स्लाईडद्वारे आणखी वाचा, जयंत पाटील यांनी मोदींना लिहलेल्या पत्रात काय काय म्हटले आहे...
बातम्या आणखी आहेत...