आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Leader Jitendra Awhad Answer After Thretans On Fb

...ह्या असल्या भिकारड्या धमक्यांना मी भीक घालत नाही- जितेंद्र आव्हाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांना 'पंचनामा' या फेसबुक पेजवरून 'तुमचा दाभोलकर करू' अशी धमकी दिली होती. त्याला आव्हाड यांनी उत्तर दिेले असून, आपण असल्या धमक्यांना भीक घालत नसल्याचे म्हटले आहे. तसेच ज्या पंचनामा फेसबुकवरून आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकला गेला होता ते पेज चालवणा-या 10 जणांच्या कार्यकारिणीची नावे आव्हाड यांनी सांगितली आहेत.
जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत तीन दिवसापूर्वी पंचनामा या फेसबुक पेजवर आक्षेपार्ह मजकूर टाकून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या पेजवर म्हटले होते की, आत्ताच एका चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज ऐकली व वाचली. दाभोलकरच्या वधात कुठल्याही संघटनेचा हात नाहिये हे पोलीस तपासात सिद्ध झाले आहे. सनातन संस्थेची बदनामी करणा-या...XXX... आव्हाड कुठे गेला? काही झाले कि संघपरिवार आणि हिंदुत्वाला दुषणे देणारी आव्हाडसारखी ...xxx... दाभोलकर करण्याची आता वेळ आलीये.. एक लक्षात ठेवा हिंदुत्व हा जळजळीत अंगार आहे आडवे याल तर तिडवे करु. आव्हाडसारख्या...xxx... मावळ्यांनी खरी लायकी दाखवावी. XXX आव्हाडचा नंबर असेल तर द्या कोणाकडे... अशा प्रकारचा मजकूर टाकला होता.
दरम्यान, आव्हाड यांनी असल्या धमक्यांना आपण भीक घालत नसल्याचे म्हटले आहे. आव्हाड यांनी म्हटले आही की, ही विचाराची लढाई आहे. विचाराच्या लढाईत असे होणारच, पण मृत्यूला पण आव्हान देणारे फुले, शाहूंची लेकरे आहोत आम्ही. बाबासाहेबांना बाप मानणारे आहोत आम्ही. त्यामुळे ह्या असल्या धमक्यांना कोण घाबरतो. पुरोगामी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी जर माझा प्राण गेलाच तर स्वत:ला नशिबवान समजेन. किती जणांना माराल तुम्ही, इथे प्रत्येक घरात पुरोगामी महाराष्ट्राचे रक्षण करणारे शिवाजी जिजाऊच्या पोटी जन्म घेत असतात. तेव्हा विचाराच्या लढाईला विराम नाही आणि आरामही नाही. जय महाराष्ट्र... जय भीम... असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
पंचनामा फेसबुक पेज चालवणा-या दहा जणांची नावे वाचा पुढे....