आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Leader Nawab Malik Comment On BJP And Shiv Sena

भाजप- शिवसेनेचा हनिमून आता संपला; नवाब मलिक यांची टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजप- शिवसेनेचा हनिमून संपुष्टात आल्यानेच भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस सगळीकडे टाळीसाठी हात पुढे करीत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केली. तसेच मुख्यमंत्र्यांचेही शिवसेना प्रेम आटले असल्याचा टोला मलिक यांनी लगावला.

पत्रकारांशी बोलताना मलिक यांनी सांगितले की, एखादा पक्ष कमजोर झाला की त्यापासून दूर पळण्याचा भाजपचा इतिहास आहे. त्यामुळेच फडणवीस ‘एमडीए’चा प्रयोग करून त्यात मनसेला घेण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. पण शिवसेनेचा विरोध असल्यामुळे सध्या भाजपाची अडचण झाली आहे.
रेसकोर्स येथील थीमपार्कविषयी उध्दव ठाकरे यांना कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे शिवसेनेविषयी त्यांचे असलेले प्रेम कमी होत असल्याचेही मलिक यांनी म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. त्याला प्रतिसाद न देणारे मुख्यमंत्री थीमपार्कच्या सादरीकरणासाठी वेळ कसा देतात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

रायगडावरील राज्याभिषेक शासकीय सोहळा नाही
रायगडावर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानिमित्त आयोजित कार्यक्रमाला सरकारतर्फे कोणी का गेले? या प्रश्नावर मलिक म्हणाले की, हा सोहळा शासकीय कार्यक्रम नसल्याने मंत्री गेले नाहीत. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.