आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिपद काढण्यासाठीच खडसेंची चौकशी; नवाब मलिक यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भूखंडप्रकरणी िनवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची घाेषणा म्हणजे त्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याचाच डाव अाहे,’ असा अाराेप राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर मलिक यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हाेता. त्यानंतर न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या नेतृत्वातील समितीमार्फत चौकशीलाही सामोरे जावे लागले. ‘ही चौकशी प्रक्रिया इतकी किचकट अाणि वेळखाऊ होती की यामधून िनष्पन्न काहीही झाले नाही, मात्र पुन्हा मंत्रिमंडळात येता अाले नाही. माझ्या बाबतीत जे झाले तेच खडसेंबाबत होईल,’ असा दावाही मलिक यांनी केला. ‘चौकशी समितीची प्रक्रिया खूप किचकट असते. सहा महिन्यांत चौकशी हाेईल, असे मुख्यमंत्री सांगत असले तरी त्याची खात्री देता येत नाही. माझ्या चाैकशीसाठी समितीला कार्यालय देण्यात आले. मला नेहमी बाेलावले जायचे. ही चौकशी अनेक वर्षे चालली होती. माध्यमांकडून वार्तांकन केले जायचे. यामधून माझी बदनामीच झाली, पण आरोप काही िसद्ध झाले नाहीत. खडसेंच्या बाबतीतही असेच हाेईल. अाधी राजीनामा देण्यास भाग पाडायचे अाणि नंतर चौकशीचा ससेमिरा मागे लावायचा, हा प्रकार म्हणजे खडसेंना मंत्रिमंडळाचे दरवाजे बंद करण्याचा डाव असल्याचे स्पष्ट होते, असे मलिक म्हणाले.

पवारांना सल्ला
सिंचनातील भ्रष्टाचाराच्या अाराेपानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला हाेता. चाैकशीला सामाेरे जाण्याची त्यांची तयारी हाेती. पण शेवटी मी तसेच अन्य नेत्यांनी त्यांना समजावले. ‘चौकशी समितीमधून काहीच िनष्पन्न होणार नाही, मात्र नको तितकी बदनामी हाेईल,’ असे सांगितल्यानंतर पवार मागे फिरले पुन्हा मंत्रिमंडळात अाले, अशी अाठवणही मलिक यांनी सांगितली.

पुढील स्लाइडवर वाचा, ‘महाजनांची निवडच रद्द करा’

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)