आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्‍ट्रवादीच्या नेत्याने आयएएस अधिकार्‍याच्या तोंडावर फेकली फाईल; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पाटील यांच्यावर एका आयएएस अधिकार्‍याला शिविगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात प्रशांत पाटील संबंधित अधिकार्‍याच्या तोंडावर फाईल फेकताना दिसत आहे. इतकेच नाही तर ते अधिकार्‍याच्या अंगावर धावून जातात. शिविगाळ करताना दिसत आहेत.

काय आहे हे प्रकरण?
- मिळालेली माहिती अशी की, हा व्हिडिओ 12 ऑगस्टचा असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- प्रशांत पाटील रायगड येथील जवाहरलाल नेहरू पोर्टच्या प्रशासकिय इमारातीत एका बैठकीला उपस्थित होते.  
- बैठकीला जेएनपीटीचे सीईओ सुरेश अमिरापू यांच्यासह अनेक बडे अधिकारी उपस्थित होते.
- चर्चा सुरु असताना प्रशांत पाटील अचान संतापले आणि त्यांनी एका आयएएस अधिकार्‍याच्या शर्टची कॉलर पकडली. त्याला धक्काबुक्की केली. इतकेच नाही तर राष्ट्रवादीच्या नेत्याने अधिकार्‍याच्या खुर्चीला लाथही मारली.
- बैठकीला उपस्थित असलेल्या एकाने प्रशांत पाटील यांचे कारनामे मोबाइल कॅमेर्‍यात कैद केले. पीडित अधिकार्‍यांनी पोलिसांत प्रशांत पाटील यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटोज आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...