आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Leader RR Patil Introduction News In Marathi

PHOTO : आबांचा अल्‍पपरिचय आणि त्‍यांनी घेतलेले महत्त्‍वपूर्ण निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाच्या कारकीर्दीत आर. आर. यांनी घेतलेल्या डान्सबार बंदीच्या निर्णयाला त्यांच्या राजकीय आयुष्यात एक मोठे स्थान आहे. डान्सबार मालक, बारबालांसह समाजातल्या एका विशिष्ट वर्गातून टीकाही झाली. मात्र, तरीही आपल्या निर्णयावर ठाम राहत आबांनी ही बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
16 ऑगस्ट 1957
रावसाहेब रामराव ऊर्फ आर. आर. पाटील यांचा जन्म सांगलीतील अंजनी गावात. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी आली. ती सांभाळतानाच अाबांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे सांगलीतील शांतिनिकेतन महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतून पदवीपर्यंत आणि नंतर वकिलीचेही शिक्षण घेतले.

1979 पासून आर. आर. यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. त्यांनी सांगली जिल्हा परिषदेसाठी सावळज जिल्हा परिषद गटातून पहिल्यांदा निवडणूक लढवली. राजकारणात नवखे असूनही जनतेच्या पाठिंब्यामुळे पहिल्याच निवडणुकीत आबा बहुमताने निवडून आले.

1979 ते 18990
या अकरा वर्षांत त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कारभार सांभाळला.
1990
मध्ये आर. आर. यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर तासगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांनी तीन वेळा आमदार राहिलेल्या दिनकर आबा पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत आबा मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस पक्षापासून विभक्त होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्या वेळी आबांनी पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. १९९० नंतर 1995 1999, 2004, 2009 आणि 2014 असा सलग पाच वेळा अामदार हाेण्याचा बहुमानही त्यांना मिळाला.
पुढील स्‍लाईडवर वाचा आबांच्‍या काळातील महत्त्वपूर्ण निर्णय...