मुंबई- शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहास तज्ज्ञ समजले जाते. त्यांनी मराठेशाहीवर भरीव लिखाण केले आहे. जर ते इतिहासतज्ज्ञ होते तर त्यांनी जेम्स लेनच्या वादग्रस्त लिखाणावर टिका का केली नाही? पुरंदरे गप्प का आहेत? त्यांनी अक्षेप का घेतला नाही? असे खोचक प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना विचारले आहेत. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आव्हाड बोलत होते.
आव्हाड यांनी
ट्विटरवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आदरणीय जिजाऊंचे चारित्र्यहनन करणाऱ्या जेम्स लेनने पुस्तकात बाबासाहेब पुरंदरे यांचे आभार व्यक्त केले आहे. त्यावर पुरंदरे यांनी अद्याप एक शब्दही काढलेला नाही.
पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना काही खोचक प्रश्न विचारले आहेत. आता याचे महाराष्ट्राच्या राजकारणात काय पडसाद उमटतात हे बघण्यासारखे आहे. शिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आव्हाड अगदी विश्वासू आहेत. ते यावर काय भूमिका घेतात हे बघण्यासारखे असेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर काय म्हटले....