आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ncp May Fight Without Congress Upcoming Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काय चाललयं राष्ट्रवादीत? 288 उमेदवार देण्यासाठी नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरुच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेस पक्षाने 118 जागांवर उमेदवार जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव वाढविला असतानाच राष्ट्रवादीने त्याला फारसे महत्त्व दिले नाही. राष्ट्रवादीने स्वबळावरच लढण्याचा व पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन दिवसापासून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आघाडीबाबत काहीही प्रतिक्रिया न देता स्वबळाच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर कालच्यापासून राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांची 288 जागांवर उमेदवार ठरविण्यासाठी मॅरेथॉन बैठका व चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आज सायंकाळी किमान 100 उमेदवार जाहीर करणार आहे. काँग्रेसच्या दबावाला न जुमानता राष्ट्रवादीही उमेदवार यादी जाहीर करून उत्तर देणार आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल दिल्लीकडे रवाना झाले असून, काँग्रेससोबत अंतिम वाटाघाटी करणार आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी झाल्याचे पहिल्यापासून दिसून येत आहे. मात्र हे दोन्ही पक्ष मुरब्बी व अनुभवी असल्याने महायुतीतील तमाशा लांबून पाहत आहेत अशी चर्चा होती. मात्र, ही चर्चा तितकीशी खरी ठरली नाहीये. राष्ट्रवादीने 144 जागांच हव्या अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद हवे असा काँग्रेसवर बॉम्बगोळा टाकला. याचबरोबर जे अपक्ष आमदार आमच्या पक्षात आले आहेत त्यांच्यासाठी जागा सोडाव्यात असा प्रस्ताव राष्ट्रवादीने दिला. अर्थातच तो काँग्रेससाठी डोईझड वाटू लागला. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीशी जागावाटपाची बोलणीच बंद करून टाकली. त्याचवेळी अजित पवारांच्या गटाने राष्ट्रवादीतच स्वबळाचा नारा देत आता नाही तर कधीच नाही असे सांगत वेगळे लढलो तरच पक्ष वाढेल असे सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढली तरी सत्ता मिळेल याची खात्री नाही त्यापेक्षा पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी स्वबळावर लढल्यास फायदा होईल. याचबरोबर किमान 100 जागांवर आपले उमेदवार तगडेच आहेत. जनमत विरोधात गेले तरी ते चांगले टक्कर देऊ शकतात, असे वरिष्ठ नेत्यांची कानी घातले.
अजित पवार व तटकरेंचे गणित प्रफुल्ल पटेलांना पटले आहे. शरद पवार, भुजबळ, आर आर पाटील हे आघाडीने निवडणुकीस सामोरे जावे यामताचे आहेत. मात्र अजित पवार व तटकरेंनी काँग्रेससोबत गेल्याने आपला पक्ष वाढला नाही व भविष्यातही वाढू शकणार नाही याची उदाहरणासह माहिती दिली. राहुल गांधी राष्ट्रवादीला फारशी किंमत द्यायला तयार नाहीत अशा स्थितीत शरद पवारांचे मन वळविण्याची जबाबदारी अजित पवारांनी पटेलांवर सोपवली आहे. पटेलांना काँग्रेससोबत फारसे भविष्य दिसत नाही. त्यामुळे आता केंद्रात विरोधात आहे तर राज्यातही बसू. पुढील काळात तरी पक्ष नव्या उमेदीने लोकांसमोर जावू असे पटेलांना वाटत आहे. मात्र अजित पवार, तटकरे व पटेलांचे गणित पवारांना रूचत नाही. आता देशात उजव्या विचारसरणीचे सरकार आले आहे. त्यामुळे आताच काही उपाययोजना करून त्यांना न रोखल्यास या शक्ती राज्यातही मोठ्या प्रमाणात फोफावेल व आपले राजकारण संपवून टाकेल अशी भीती पवारांना वाटत आहे. त्यामुळे ते काँग्रेससोबतच राहू इच्छित आहेत, असे राष्ट्रवादीतील आमच्या सूत्रांनी स्पष्ट केले.