आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp May Today Decleare 15 Canditate For Loksabha, Memon Name Will Be Finallised

राष्ट्रवादीचे लोकसभेचे 15 उमेदवार आज जाहीर होणार? राज्यसभेसाठी मेमन निश्चित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कोणत्याही परिस्थितीत एकही जागा कमी घ्यायची नाही. काँग्रेससोबत आघाडी झाली किंवा नाही तरी 22 जागा लढवूच अशी वारंवार दर्पोक्ती फोडणारी राष्ट्रवादी आज आपले किमान 14-15 जागांवर उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर सध्या होत असून, लोकसभेचे संभाव्य उमेदवार कोण यावर चर्चा करून अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. याचबरोबर राज्यसभेच्या दुस-या जागेसाठी अॅड. माजिद मेमन यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून, या बैठकीत मेमन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
पक्षाध्यक्ष शरद पवार शुक्रवारी राज्यसभेचा अर्ज दाखल करणार आहेत. याचबरोबर त्यापूर्वी दुसरा उमेदवार पक्षाला निश्चित करायचा आहे. याचबरोबर लोकसभेचे 14 ते 15 उमेदवारांची नावे अंतिम करून त्यांना तयारीचे आदेश देण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीने लोकसभेच्या 22 जागांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचबरोबर शिरूर, माढा, रावेर, जळगाव लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार कोण असतील, याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. पक्षाकडून याबाबत झालेल्या सर्व निर्णयाची माहिती व उमेदवारांची यादी दुपारनंतर जाहीर होईल.