आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीची मुंबईत बैठक, काँग्रेसच्या तुलनेत यश न मिळाल्यावर चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोजक्या नेत्यांची बैठक मुंबईत आज दुपारी 12 च्या सुमारास सुरु झाली. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेल्या या बैठकीत विविध विषयावर ऊहापोह करण्यात येणार आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले आहे. मात्र, आपला सहकारी मित्र असलेल्या काँग्रेसच्या तुलनेत पक्षाला कमी यश मिळाल्याची खंत पवारांना वाटत आहे. त्यामुळे पक्षाचे संघटन मजबूत करण्याबरोबरच आगामी काळात राजकीय रणनिती काय असावी यावर बैठकीत भर दिला जात आहे. या बैठकीला शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह मोजकेच नेते उपस्थित आहेत.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला सोलापूरमधील हक्काची जागा गमवावी लागली. तसेच नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला 100 हून अधिक जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीला 80-85 च्या घरात जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस एक क्रमांकावर तर राष्ट्रवादी दुस-या क्रमांकावर आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेनेचा कामगिरी खालावली आहे. त्यामुळे सरकारविरोधात जनमत तयार होत असल्याचा अंदाज येताच पवारांनी आपल्या शिलेदारांना बोलवून पक्ष संघटनेकडे लक्ष देण्याचा आदेश देऊ शकतात.
यासोबतच, राज्याला भेडसावत असलेल्या भीषण दुष्काळाबाबत पक्षाची भूमिका काय असावी यावर चर्चा केली जाणार आहे. दुष्काळाचे गडद होत असलेले सावट, चारा, पाणी आदींवर सरकारकडून करण्यात आलेल्या अंमलबजावणी करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असा कानमंत्र पवार देण्याची शक्यता आहे.