आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Meeting Is Going On Today At Mumbai For Over Loksabha Seats Sharing

राष्ट्रवादीची भूमिका: लोकसभा जागा वाटपाचा निर्णय काँग्रेससोबत चर्चा करून घेणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा जागावाटपाच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत आज महत्त्वाची बैठक झाली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या बैठकीला पक्षातील मोजके 22 वरिष्ठ नेते उपस्थित होते. यात राज्यातील कोणत्या मतदारसंघावर राष्ट्रवादीने हक्क सांगावा, कोणत्या मतदारसंघात आपली ताकद मजबूत आहे व यापूर्वी पक्षाने लढविलेल्या व पराभव पत्कराव्या लागलेल्या जागांची अदलाबदल आदी महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. तसेच 22-26 फॉर्म्यूल्यावर काँग्रेससोबत चर्चा करून निर्णय घेण्यात आल्याचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
देशात लोकसभेच्या निवडणकीने काहूर माजू लागले आहे. काँग्रेस आणि भाजप आपापल्या वर्चस्वासाठी जोरदार प्रयत्न करीत असून, महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासाठीही ही निवडणूक महत्त्वाची आहे. भाजपने मोदी यांना पुढे आणल्यानंतर भाजप अधिक एकसंध झाला असून, मोदींचे आकर्षण देशभर वाढत चालले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार असून, मोदींची संभाव्य लाट रोखण्याची रणनिती काँग्रेस व राष्ट्रवादी सध्या आखत आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या महिन्याभरात दोन्ही पक्ष जागांवाटपाचा तिढा सोडविणार आहेत. त्यासाठी दोन्ही पक्षांनी आपापल्या मतदारसंघातून तयारी सुरु केली आहे.
मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपाचा घोळ सुरु आहे. कोण किती जागा लढविणार यावरून दोन्ही पक्षातील नेते वेगवेगळे वक्तव्ये करीत सुटली आहेत. एकून या दोन पक्षात फारसा चांगला समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. याचा फटका या दोन्ही पक्षाला बसण्याची शक्यता असून, त्याचाच फायदा उचलण्याची तयारी महायुतीने सुरु केली आहे. दरम्यान, यामुळे जागे झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने हा वाद सोडविण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढे वाचा, कोणते मतदारसंघ हवे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला....