आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकांच्या मनात अनेक शंका, मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी- जयंत पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूबाबत राज्याच्या लोकांत आजही अनेक शंका आहेत. ती शंका दूर करण्यासाठी व लोकांच्या भावनांची दखल घेत केंद्र सरकारने मुंडेंच्या मृत्यूची चौकशी सीबीआयद्वारे केली पाहिजे अशी भूमिका राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी मांडली. काँग्रेसने राष्ट्रवादीला देऊ केलेल्या 128 जागांबाबत पक्ष असमाधानी आहे. तसेच राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळालेच पाहिजे अशी जोरदार फटकेबाजीही पाटील यांनी केली. जयंत पाटील एका वृत्तवाहिनीवर बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, काँग्रेसने राष्ट्रवादीला 128 जागा देऊ केल्या आहेत. त्यापेक्षा अधिक जागा दिल्या पाहिजेत. राष्ट्रवादीची राज्यात मोठी ताकद आहे. 2004 साली राज्यातील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी बनला. तरीही काँग्रेसला आम्ही आग्रहास्तव मुख्यमंत्री दिले. समविचार पक्षांनी एकत्र राहावे व धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आम्ही काँग्रेससोबत 15 वर्षापासून राहिलो. गेली 15 वर्ष काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा जो प्रस्ताव ठेवला आहे तो योग्य आहे. आताही काँग्रेससोबत आघाडी व्हावी अशी राष्टवादीची इच्छा आहे. मात्र काँग्रेस चर्चेलाच तयार नाही. चर्चा केली नाही तर प्रश्न कसा सुटणार आणि आमचे म्हणणे कसे पटवून सांगणार असे जयंत पाटील यांनी सवाल उपस्थित केला.