आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीचे मंत्री व जळगावचे पालकमंत्री संजय सावकारे भाजपात, कथोरेंचाही प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जळगावचे पालकमंत्री संजय सावकारे किती चलाख व चाणाक्ष नेते आहेत याची कल्पना आपल्याला या छायाचित्रावरून नक्कीच येईल)
मुंबई- जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सावकारे यांनी भाजपात प्रवेश केला. सावकारे सध्या राष्ट्रवादीचे मंत्री असून, त्यांच्याकडे कृषीराज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. मंत्री असूनही त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मुरबाडचे राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांनी मागील महिन्यात पक्षाला रामराम ठोकला होता. त्यांनीही सावकारे यांच्यासमवेत व खडसेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
माजी आमदार संतोष चौधरी यांचे स्वीय असलेले सावकारे राजकारणात गद्दारी करण्यात पटाईत असल्याचे बोलले जाते. भुसावळ मतदारसंघ राखीव झाल्यानंतर चौधरींनी सावकारेंना आमदार बनविले. मात्र, लवकरच त्यांनी चौधरींना धोका देत सवतासुभा उभा केला. ज्या राष्ट्रवादीने त्यांना आमदार, मंत्री केले त्यांनाही सावकारे यांनी सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून सावकारे किती चलाख राजकारणी आहेत याचे दर्शन होते.
दरम्यान, गुलाबराव देवकर यांच्याशी सावकारे यांची मागील काही काळात जवळीक होती. पण सावकारेंना अलीकडच्या काळात राष्ट्रवादीत फारसे गृहित धरले जात नव्हते. खडसेंशी कधी काळी संघर्ष केलेले सावकारे आता त्यांच्या मदतीने भाजपात जात आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. आज भाजपात चाललेले सावकारे भविष्यात कोणत्या पक्षात असतील हे सांगता येत नाही असे शिवसेनेचे नेते राजेश झाल्टे यांनी म्हटले आहे.