आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीचे कोकणातील मंत्री उदय सामंत शिवसेनेत, उद्या अर्ज दाखल करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रत्नागिरीचे आमदार व नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असून, ते आजच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उदय सामंत हे उद्या शिवसेनेच्या तिकीटावर अर्ज दाखल करतील. रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून सामंत हे मागील दोन टर्म आमदार आहेत. राष्ट्रवादीने त्यांना वर्षभरापूर्वी प्रथमच राज्यमंत्रीपद दिले होते. त्यापूर्वी त्यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद दिले होते.
रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातून महायुतीतून भाजपचे बाळ माने हे उमेदवार होते. ते आज अर्ज दाखल करणार होते. मात्र, कालच रात्री भाजप-सेनेची युती तुटली. त्यामुळे भाजप-सेने स्वतंत्र उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले. उदय सामंत यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून येणे अवघड होते. रत्नागिरी मतदारसंघात भाजप-सेनेला मानणारा वर्ग जास्त आहे. त्यामुळे सामंत यांनी मागील काही दिवसापासून शिवसेनेशी संपर्क वाढविला होता. मागील आठवड्यातही सामंत शिवसेनेच्या वाटेवर असल्याची बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यावेळी त्यांनी त्याचे खंडन केले होते. अखेर उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.