आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीच्या आमदाराची अधिकाऱ्याला मारहाण, कर्जतमधील प्रकार ‘व्हिडिआे’मुळे चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात रिलायन्स गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी काेऱ्या कागदांवर शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या आहेत. याबाबत तक्रारी करूनही कारवाई हाेत नसल्याचा आराेप करत राष्ट्रवादी कांॅग्रेसचे स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी भूसंपादनासाठी नेमण्यात आलेले विशेष अधिकारी अभय कलगुटकर यांना ११ ऑगस्ट रोजी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिआे सर्वत्र पसरल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. लाड व राष्ट्रवादी कांॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र असा मारहाणीचा प्रकार घडलाच नसल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्याने मात्र याबाबत पाेलिसात तक्रार दिलेली नाही.

कर्जत तालुक्यातून रिलायन्स गॅस पाइपलाइन टाकली जाणार आहे. मात्र या कामासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी नेमलेले अधिकारी हे शेतकऱ्यांना कर्जत तहसील कार्यालयाच्या बाहेर असलेल्या सभागृहात बोलावून कोऱ्या कागदावर सही घेतात. फसवणूक होत असलेल्या शेतकऱ्यांनी आमदार लाड यांच्यापुढे कैफियत मांडली होती. त्यामुळे ११ ऑगस्ट रोजी लाड यांनी रिलायन्सचे अधिकारी बसत असलेल्या कर्जत तहसील कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकप्रतिनिधी आम्हाला जाब विचारू शकत नाही असे तिथे त्यांना उत्तर मिळाले. त्यामुळे संतापलेल्या लाड यांनी कालगुटकर यांच्या कानशिलात लावल्याचे चित्रफितीत दिसत आहे.

रिलायन्सची दादागिरी सहन करणार नाही
मी कुणालाही मारहाण केलेली नाही. व्हिडिओ बघून संबंधितांनी तक्रार केली आणि कर्जत पोलिसांनी चौकशी करून माझ्यावर गुन्हा दाखल केला तर आपण त्या गुन्ह्यात जामीन घेणार नाही. कारण आपण स्वतः शेतकरी असून रिलायन्सची दादागिरी आपण सहन करणार नाही. - सुरेश लाड, आमदार

कोण आहेत सुरेश लाड
६० वर्षीय सुरेश लाड हे दहावी उत्तीर्ण असून रायगड जिल्ह्यातील कर्जत या मतदारसंघातून २००४ ते २०१४ असे सलग तीनदा अमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहे. त्यापूर्वी त्यांनी कर्जत पंचायत समितीचे सभापतिपद आणि दहिवली या त्यांच्या गावाचे सरपंच पदही भूषविले आहे.
बातम्या आणखी आहेत...